Advertisement

अभिनेत्री रेखा यांचा बंगला सील, 'हा' व्यक्ती आला पॉझिटिव्ह

अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांच्या बंगल्यानंतर आता रेखा यांचा बंगला देखील सील करण्यात आला आहे.

अभिनेत्री रेखा यांचा बंगला सील, 'हा' व्यक्ती आला पॉझिटिव्ह
SHARES

कोरोनाव्हायरस आता बॉलिवूड कलाकारांच्या घरात पोहोचला आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री रेखाच्या बंगल्याबाहेर तैनात असलेला सुरक्षा रक्षक COVID 19 पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर रेखा यांचा बंगला सील करण्यात आला आहे.

रेखा यांच्या बंगल्याचं नाव सी-स्प्रिंग्स आहे जे बॅन्डस्टँडमध्ये आहे. तसंच, त्यांच्या बंगल्याबाहेर पालिकेनं कंन्टेंमेंट झोनची नोटीस लावली आहे.

वांद्रेच्या बॅन्डस्टँडमधील रेखा यांच्या 'सी स्प्रिंग्स' इमारतीत दोन सुरक्षा रक्षक तैनात आहेत. त्यातील एकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर पालिका अधिकाऱ्यांनी बंगला सील केला.याशिवाय बंगल्याबाहेर कन्टेंमेंट झोन म्हणून बोर्ड देखील लावला. टीओआयनं दिलेल्या वृत्तानुसार, संपूर्ण परिसर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सील केला आहे.

अमिताभ बच्चन देखील COVID 19 पॉझिटिव्ह आले आहेत. त्यानंतर अभिषेक बच्चनची देखील Corona चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. दोघांवर नानावटी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. दोघांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत.

यापूर्वी जान्हवी कपूर, आमिर खान आणि करण जोहर या कलाकारांच्या घरापर्यंत कोरोना पोहोचला आहे. त्यांच्या घरात काम करणाऱ्या अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे.
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा