Advertisement

अभिनेत्री रेखा यांचा कोरोना चाचणी करण्यास नकार

रेखानं स्वत:ची कोरोना चाचणी करण्यास नकार दिला आहे.

अभिनेत्री रेखा यांचा कोरोना चाचणी करण्यास नकार
SHARES

ज्येष्ठ अभिनेत्री रेखाचा सुरक्षा रक्षक अलीकडेच कोरोना पॉझिटिव्ह आल्याचं समोर आलं होतं. आता आरोग्य सेवा अधिका्यांना अभिनेत्री रेखा आणि अन्य स्टाफ सदस्यासह संरक्षकांच्या संपर्कात असलेल्या सर्वांची चाचणी घ्यायची आहे. पण बातमी अशी आहे की, रेखानं स्वत:ची कोरोना चाचणी करण्यास नकार दिला आहे. याशिवाय रेखानं पालिका अधिकाऱ्यांना घरात प्रवेश देण्यासही नकार दिला आहे.

बॉलिवूड लाइफनं दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई महानगरपालिका रेखा यांच्या घरी पोहोचली. पण त्यांची मॅनेजर फरजानानं त्यांना आपला फोन नंबर दिला आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी येण्यापूर्वी कॉल करण्यास सांगितलं. बॉलिवूड लाईफच्या वृत्तानुसार, "नंबर घ्या, मला कॉल करा आणि मग आम्ही बोलू."

वैद्यकीय अधिकारी संजय फुंडे म्हणाले की, फरझानाच्या वतीनं असं म्हटलं होतं की, कोरोना पॉझिटिव्ह आढळला तो सुरक्षा रक्षक रेखाच्या संपर्कात नव्हता. त्याचवेळी रेखानं म्हटलं आहे की, तिला कोरोनाची कोणतीही लक्षण आढळली नाही. "६५ वर्षीय रेखानं असंही म्हटलं आहे की, तिला कोणतीही लक्षणं नाहीत. जर लक्षणं आढळली तर कोरोना चाचणी नक्कीच करून घेईन.


हेही वाचा : ऐश्वर्या राय-बच्चन, आराध्या देखील COVID 19 पॉझिटिव्ह


अभिनेत्री रेखाच्या बंगल्याबाहेर पालिकेनं कन्टेंमेंट झोनचा बोर्ड लावला आहे. त्यांच्या बंगल्यात आढळलेला कोरोना पॉझिटिव्ह सुरक्षारक्षकावर उपचार सुरू आहेत. सध्या सुरक्षारक्षक मुंबईच्या बीकेसी परिसरातील रुग्णालयात उपचार घेत आहे. रेखाच्या बंगल्याचं निर्जंतुकीकरण देखील करण्यात आलं. यासह, महापालिकेच्या लोकांनी आसपासच्या परिसराची स्वच्छता देखील केली आहे.

गेल्या शनिवारी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्याच दरम्यान रेखा यांच्या बंगल्यावरील सुरक्षारक्षक देखील पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर रेखा यांचा बंगला सील करण्यात आला. 


हेही वाचा

सुशांत सिंग राजपूतच्या आठवणीत रिया चक्रवर्तीनं उचललं 'हे' पाऊल

कॉमेडी-ड्रामा 'लूटकेस' या तारखेला होणार प्रदर्शित

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा