Advertisement

मुंबईत कोरोनाचे १११८ नवे रुग्ण, दिवसभरात ६० जणांचा मृत्यू

तर बुधवारी दिवसभरात ९१६ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ८५ हजार ३२७ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे

मुंबईत कोरोनाचे १११८ नवे रुग्ण, दिवसभरात ६० जणांचा मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात आज कोरोनाने २९८ जणांचा बळी घेतला. असे असताना मुंबईत मात्र काही प्रमाणात कोरोनावर मिळवण्यात पालिकेला यश आल्याचे पहायला मिळते. मुंबईत बुधवारी दिवसभरात १११८ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत बुधवारी दिवसभरात ६० जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः-सुशांत आत्महत्या प्रकरणात न्यायवैद्यक शाळेच्या अहवालातून स्पष्ट झाली ‘ही’ बाब

राज्यात कोरोनाच्या वाढत्या मृत्यूवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सध्या कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६० टक्क्यांवर . मृतांच्या एकूण संख्येत बुधवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ६० रुग्ण दगावले आहेत. तर २८ जुलै रोजी ५५ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी २७ जुलै रोजी एकूण ३९ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, बुधवारी मुंबईत कोरोनाचे १११८ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता १ लाख११ हजार  ९६४ इतकी झाली आहे. तर बुधवारी दिवसभरात ९१६ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ८५ हजार ३२७ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः-एसबीआयमध्ये सर्कल बेस ऑफिसर पदासाठी भरती

राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत असून हे प्रमाण ५९.८४ टक्के एवढे झाले आहे. आज देखील ७४७८ रुग्ण बरे होऊन घरे गेले आहेत. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ३९ हजार ७५५ झाली आहे.आज ९२११ नविन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ४६  हजार १२९  रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २० लाख १६ हजार २३४ नमुन्यांपैकी ४ लाख ६५१ नमुने पॉझिटिव्ह (१९.८७ टक्के) आले आहेत. राज्यात ८ लाख ८८ हजार ६२३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४० हजार ७७७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २९८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.६१ टक्के एवढा आहे.

हेही वाचाः- आश्चर्य! ५७ टक्के झोपडपट्टीवासियांची प्रतिकारशक्तीच्या जोरावर कोरोनावर मात

आज निदान झालेले ९२११ नविन रुग्ण आणि नोंद झालेले २९८ मृत्यू यांचा  तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-११०९ (६०), ठाणे- २३१ (१३), ठाणे मनपा-२८८ (१३),नवी मुंबई मनपा-३८० (६), कल्याण डोंबिवली मनपा-३०९ (१५),उल्हासनगर मनपा-८१ (७), भिवंडी निजामपूर मनपा-२४ (७), मीरा भाईंदर मनपा-१११ (३), पालघर-७९ (१), वसई-विरार मनपा-२१५ (७), रायगड-३४७ (५), पनवेल मनपा-१५० (२), नाशिक-९९ (३), नाशिक मनपा-४१० (२), मालेगाव मनपा-१८, अहमदनगर-१३३, अहमदनगर मनपा-१७४, धुळे-९० (२), धुळे मनपा-५६ (३), जळगाव-१५४ (१०), जळगाव मनपा-३७ (२), नंदूरबार-११ (३), पुणे- २९४ (१०), पुणे मनपा-१४५८ (४०), पिंपरी चिंचवड मनपा-८३९ (१०), सोलापूर-२०४ (११), सोलापूर मनपा-४८ (४), सातारा-१४१ (७), कोल्हापूर-११२ (३), कोल्हापूर मनपा-४४ (१), सांगली-२९, सांगली मिरज कुपवाड मनपा-११०, सिंधुदूर्ग-१४, रत्नागिरी-५४, औरंगाबाद-१२९ (५), औरंगाबाद मनपा-४०९ (१२), जालना-१७ (४), हिंगोली-१० (१), परभणी-९, परभणी मनपा-२३ (२), लातूर-५२ (२), लातूर मनपा-१७, उस्मानाबाद-५१ (१), बीड-३८ (२), नांदेड-८९ (१), नांदेड मनपा-४ (२), अकोला-८ (३), अकोला मनपा-३ (१), अमरावती-२४, अमरावती मनपा-८० (३), यवतमाळ-२३, बुलढाणा-४० (२), वाशिम-२१ (१), नागपूर-९३ , नागपूर मनपा-१५३ (५), वर्धा-१३, भंडारा-६, गोंदिया-६, चंद्रपूर-१४, चंद्रपूर मनपा-९, गडचिरोली-६, इतर राज्य ११ (१).

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा