Advertisement

आश्चर्य! ५७ टक्के झोपडपट्टीवासियांची प्रतिकारशक्तीच्या जोरावर कोरोनावर मात

झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या ५७ टक्के लोकांच्या शरीरात कोरोनाच्या प्रति अँटिबॉडी आढळून आल्या आहेत. म्हणजेच या लोकांना कोरोना होऊन तो बराही झाला तरी त्यांना कळलेलं नाही.

आश्चर्य! ५७ टक्के झोपडपट्टीवासियांची प्रतिकारशक्तीच्या जोरावर कोरोनावर मात
SHARES

मुंबईतल्या झोपडपट्टीवासियांनी प्रतिकारशक्तीच्या जोरावर कोरोनाला परतवलं असल्याचं समोर झालं आहे.  झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या ५७ टक्के लोकांच्या शरीरात कोरोनाच्या प्रति अँटिबॉडी आढळून आल्या आहेत. म्हणजेच या लोकांना कोरोना होऊन तो बराही झाला तरी त्यांना कळलेलं नाही. इतर रहिवासी भागांमधील रहिवाशांमध्ये १६ टक्के अँटिबॉडी आढळून आल्या आहेत. नुकत्याच पार पडलेल्या सेरो सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. 

निती आयोग, मुंबई महानगरपालिका, टाटा मूलभूत संशोधन संस्था (टीआयएफआर) यांच्यावतीने आर उत्तर (दहिसर), एम पश्चिम (चेंबूर)आणि एफ उत्तर (माटुंगा) या भागांत जुलैच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये ६ हजार ९३६ लोकांचा
सेरो सर्व्हे केला. या सर्व्हेमध्ये झोपडपट्टीतील  ४ हजार लोकांचे तर बिगरझोपडपट्टी भागांतील  ३००० रहिवाशांचे नमुने घेण्यात आले होते. त्यातील झोपडपट्टीतील ५७ टक्के तर बिगरझोपडपट्टी भागांतील १६ टक्के रहिवाशांमध्ये अँटीबॉडी तयार झाल्याचं दिसून आलं. म्हणजेच इतके रहिवाशी कोरोना मुक्त झाले असून, यांच्यातील बहुतांश जणांना कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत. तर काही जणांना सौम्य लक्षणे होती.

झोपडपट्टीवासीयांना इतर भागातील रहिवाशांच्या तुलनेत कोरोनाची लागण जास्त झाली आहे. तसंच कोरोनाला परतवून लावणाऱ्या अँटिबॉडी झोपडपट्टीवासियांमध्येच अधिक आढळून आल्या आहेत. पुरुषांपेक्षा महिलांमध्ये निर्माण झालेल्या अँटिबॉडी प्रमाण किंचीत अधिक आहे. पहिल्या टप्प्यातील हे सर्वेक्षण हर्ड इम्युनिटीच्या अभ्यासासाठी पूरक ठरणार आहे. या वॉर्डांमध्ये ऑगस्टमध्ये पुन्हा सर्व्हे करण्यात येणार आहे. या सर्व्हेतून लोकांमधील हर्ड इम्युनिटी समजण्यास मदत होणार

हर्ड इम्युनिटी तयार होण्यासाठी किती प्रमाणात अँटिबॉडी सापडल्या पाहिजेत हे अद्याप अनिश्चित आहे. मोठ्या लोकसंख्येत अँटिबॉडीचे प्रमाण टिकून राहिले, तर मुंबईची हर्ड इम्युनिटीच्या मार्गानं वाटचाल सुरु होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 



हेही वाचा -

दहावीचा निकाल जाहीर, यावर्षीही मुलींचीच बाजी

'त्या' आजीबाईंच्या मदतीला धावला सोनू सूद

अभिनेता वृषभ शहाची उल्लेखनीय कामगिरी




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा