Advertisement

सेरोलॉजिकल मॉनिटरींगचा पालिका सुरू करणार दुसरा टप्पा

चाचण्यांची व्याप्ती वाढवण्यासाठी पालिका १० ऑगस्टपासून सिरो सर्वेक्षणाच्या दुसर्‍या टप्प्याचा प्रारंभ करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

सेरोलॉजिकल मॉनिटरींगचा पालिका  सुरू करणार दुसरा टप्पा
SHARES

मुंबईत २९ जुलै म्हणजे बुधवारी ५ लाखाहून अधिक कोरोनाव्हायरसच्या चाचण्या घेण्यात आल्या. ज्यात एका दिवसात केलेल्या ११ हजार ६४३ चाचण्यांचा देखील समावेश आहे. त्यानुसार आतापर्यंत घेण्यात आलेल्या एकूण चाचण्यांची संख्या ५ लाख ५ हजार इतकी झाली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, चाचण्यांची व्याप्ती वाढवण्यासाठी पालिका १० ऑगस्टपासून सिरो सर्वेक्षणाच्या दुसर्‍या टप्प्याचा प्रारंभ करणार असल्याचं सांगितलं जात आहे. अहवालानुसार हे सर्वेक्षण आर-उत्तर, एम-वेस्ट इथं केलं जाईल. एफ-नॉर्थ वॉर्ड्स इथं होणारा कोरोनाचा प्रसार समजण्यास मदत होईल.

हेही वाचा : पनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी १६४ नवीन कोरोना रुग्ण

पालिकेनं यापूर्वी शहरात घेण्यात आलेल्या सेरो चाचणीच्या पहिल्या टप्प्यातील निकाल जाहीर केला होता. आर-उत्तर, एम-वेस्ट आणि एफ-उत्तर अशा तीन प्रभागांमधील ६ हजार ९३६ नमुन्यांचातपास केल्यानंतर प्रशासनाला कळालं की, झोपडपट्टीत राहणारी ५७ टक्के रहिवासी कोरोनाव्हायरसच्या संपर्कात होते किंवा त्यांना संसर्ग होता. पालिकेनं केलेलं सेरोलॉजिकल मॉनिटरींग हे निती आयोग, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) तसंच पालिकेच्या आर-उत्तर (दहिसर), एफ-उत्तर आणि एम-वेस्ट प्रभागातील संस्थांनुसार होते. सेरोसर्वेमध्ये पुढे कोणत्याही रोगाविरुद्ध लढा देण्यासाठी शरीरात अँटीबॉडी तयार झाल्या आहेत की नाही याची तपासणी करण्यासाठी व्यक्तींच्या प्लाझ्मा सीरम चाचणीचा समावेश आहे.

प्रशासनाकडून आणखी एक सर्वेक्षण होणार आहे. ज्यामध्ये कोरोनोव्हायरसच्या प्रसाराबद्दल माहिती देण्यात येईल. लोकसंख्येमध्ये संक्रामक रोगाचा प्रसार होण्यापासून होणारी प्रतिकारशक्ती म्हणजे समूहातील रोग प्रतिकारशक्ती होय. दरम्यान बुधवारी, २९ जुलैला कोरोनोव्हायरसचे ९ हजार २११ नवीन रुग्ण समोर आले आहेत.



हेही वाचा

कल्याण डोंबिवलीत गुरूवारी ३२९ नवे रुग्ण, ११ जणांचा मृत्यू

मुंबईत महिलांमध्ये कोरोनाशी लढणाऱ्या अँटिबॉडीज जास्त

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा