Advertisement

मुंबईत महिलांमध्ये कोरोनाशी लढणाऱ्या अँटिबॉडीज जास्त

मुंबईत पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये कोरोनाशी लढणाऱ्या अँटिबॉडीज जास्त असल्याचं आढळून आलं आहे.

मुंबईत महिलांमध्ये कोरोनाशी लढणाऱ्या अँटिबॉडीज जास्त
SHARES

मुंबईत पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये कोरोनाशी लढणाऱ्या अँटिबॉडीज जास्त असल्याचं आढळून आलं आहे. मुंबईतील ५९.३ टक्के महिलांच्या शरीरात कोरोना विषाणूशी लढा देणाऱ्या अँटिबॉडी विकसित झाल्या आहेत. तर पुरुषांमध्ये हेच प्रमाण ५३.२ टक्के इतके आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तीन वॉर्डातील झोपडपट्ट्यांमध्ये महापालिकेने सेरो सर्व्हे केला आहे. यामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिला कोरोनावर मात करण्यात आघाडीवर असल्याचं समोर आलं आहे.   महिलांच्या तुलनेत पुरुषांना अधिक प्रमाणात संसर्ग झाला आहे. सेरो सर्व्हेत एकूण नमुन्यांपैकी २ हजार ३९७ म्हणजेच ५९.३ टक्के महिलांमध्ये कोरोना अँटिबॉडी असल्याचं आढळून आलं. त्या तुलनेत पुरुषांमध्ये फक्त १ हजार ९३७ म्हणजे ५३.२ टक्के कोरोना अँटिबॉडी तयार झाल्याचं आढळलं आहे. 

अनेक देशांमध्ये पुरुष आणि स्त्रियांमधील अँटिबॉडीचे प्रमाण सारखेचच असल्याचे आढळून आले आहे.  मुंबईत पुरुषांच्या तुलनेत महिला रुग्णांची संख्या कमी आहे. मुंबईत ४५ टक्के महिला कोरोनाबाधित आहेत. तर ५५ टक्के पुरुषांना कोरोना संसर्ग झाला आहे. विशेष म्हणजे झोपडपट्टी भागातील महिलांमधील अँटिबॉडीचे प्रमाण सर्वाधिक आहे.



हेही वाचा - 

Ram Mandir: बोलवलं तरी अयोध्येत भूमिपूजनाला जाणार नाही- शरद पवार




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा