Advertisement

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन पुढं ढकललं, मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख

दरवर्षीप्रमाणे जूनमध्ये सुरू होणारं महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन कोरोना संकटामुळे पुढं ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन पुढं ढकललं, मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख
SHARES

दरवर्षीप्रमाणे जूनमध्ये सुरू होणारं महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन (amid coronavirus crisis in maharashtra legislative assembly  monsoon session postponed to august) कोरोना संकटामुळे पुढं ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि लाॅकडाऊन यामुळे पावसाळी अधिवेशनावर आधिपासूनच टांगती तलवार होती. महाराष्ट्रातील कोरोनाचं संकट अधिकच गहिरं होत चाललं असून कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १ लाखांकडे वाटचाल करू लागला आहे. मुंबईतही कोरोनाबाधितांच्या संख्येने ५० हजारांहून अधिक रुग्णांची नोंद केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बुधवार १० जून २०२० रोजी  विधान भवनाच्या हिरवळीवर विधानसभा आणि विधानपरिषद कामकाजाच्या सल्लागार समितीसोबत बैठक झाली. या बैठकीत विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन पुढं ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासह मंत्रिमंडळ सदस्य आणि इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

हेही वाचा- तर पुन्हा लाॅकडाऊन करावं लागेल, उद्धव ठाकरेंचा इशारा

कामकाजाच्या सल्लागार समितीच्या बैठकीत पावसाळी अधिवेशन किती दिवसांचं घेण्यात यावं, ते कधीपासून सुरू करावं, अधिवेशन घेण्यासाठी इतर काही पर्याय आहेत काय? यावर महत्वाची चर्चा झाली. या चर्चेनंतर ३ आॅगस्टपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन घेण्यावर एकमत झालं. तसंच हे अधिवेशन १५ दिवसांचं असेल, असंही ठरवण्यात आलं. 

यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, येत्या २२ जूनपासून पावसाळी अधिवेशन घेण्याचा प्रयत्न सुरू होता. परंतु राज्यात सुरू असलेला कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव लक्षात घेता २२ जूनपासून अधिवेशन घेणं कठीण होतं. अधिवेशन एक किंवा दोन आठवड्यांचे मर्यादीत असावं, असंही काहींच म्हणणं होतं. परंतु ३ आॅगस्टपासून सुरू होणारं पावसाळी अधिवेशन १५ दिवसांचं असेल.

पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्यासाठी एका दिवसाचं विशेष अधिवेशन देखील घेतलं जाऊ शकतं, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ३ आॅगस्टपासून पावसाळी अधिवेशन घेण्यास संमती दर्शवली. पुरवणी मागण्यांसाठी एका दिवसाचं विशेष अधिवेशन घ्यावं. त्यासाठी उपस्थिती अनिवार्य नसावी, असंही फडणवीस यांनी सांगितलं.

या पावसाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहातील सदस्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित राहण्यासाठीही नियोजन करण्यात येणार असल्याचं कळत आहे. 

हेही वाचा- केंद्राकडे मुंबई लोकल ट्रेन सुरू करण्याची सातत्याने मागणी- उद्धव ठाकरे

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा