Advertisement

कल्याण डोंबिवलीत गुरूवारी ३२९ नवे रुग्ण, ११ जणांचा मृत्यू

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गुरूवारी कोरोनाचे नवीन ३२९ रुग्ण आढळले. तर ११ जणांचा मृत्यू झाला आहे.

कल्याण डोंबिवलीत गुरूवारी ३२९ नवे रुग्ण, ११ जणांचा मृत्यू
SHARES

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गुरूवारी कोरोनाचे नवीन ३२९ रुग्ण आढळले.   तर ११  जणांचा मृत्यू झाला आहे. ३०८ रुग्ण मागील २४ तासांत बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

नवीन ३२९  रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १९,६३८  झाली आहे. यामध्ये ५७८७ रुग्ण उपचार घेत असून १३,५०४  रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ३४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नवीन रूग्णांमध्ये कल्याण पूर्व ८७,  कल्याण प. ६८,  डोंबिवली पूर्व ७९, डोंबिवली प. ५१, मांडा टिटवाळा २४, तर मोहना येथील २० रूग्णांचा समावेश आहे.

डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १३९ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, १२ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, ५ रुग्ण बाज आर. आर. रूग्णालयामधून तसेच ४ रुग्ण होलीक्रॉस रुग्णालयातून  डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.



हेही वाचा - 

Ram Mandir: बोलवलं तरी अयोध्येत भूमिपूजनाला जाणार नाही- शरद पवार




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा