Advertisement

ठाण्यात पावसाचा पहिला बळी, विजेचा धक्का लागून मत्यू

घोडबंदर रोडवर एका अज्ञात व्यक्तीचा विजेच्या पोलचा धक्का लागून मृत्यू झाला आहे.

ठाण्यात पावसाचा पहिला बळी, विजेचा धक्का लागून मत्यू
SHARES

मंगळवारी सकाळपासूनच जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील सखल भागात गुडघ्यापर्यंत पाणी साचलं आहे. हवामान विभागानं मंगळवारी मुंबईत पावसाचा रेड अलर्ट जाहीर केला आहे. महापालिकेनं अत्यावश्यक सेवा वगळता सर्व अनावश्यक सरकारी कार्यालये आणि खासगी कार्यालये बंद ठेवण्यास सांगितलं आहे.

घोडबंदर रोडवर एका अज्ञात व्यक्तीचा विजेच्या पोलचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील ओवळा हनुमान मंदिराजवळ ही घटना घडली आहे. या ठिकाणी रस्त्यावरील विद्युत खांबामध्ये अचानक वीज प्रवाह उतरला होता. खांबाला स्पर्श झाल्यामुळे एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. या व्यक्तीचा मृतदेह हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

हेही वाचा : Mumbai Rains : मुंबईत मुसळधार पाऊस, रेड अलर्ट जाहीर

घोडबंदर रोड वर दुसरी देखील एक घटना घडली आहे. तुळशी धाम इथं झाडं आणि विद्युत पोल कोसळण्याची घटना समोर आली आहे. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी आपत्ती व्यवसाथपन आणि अग्निशमन दलाचे जवान रवाना झाले आहेत.

मुसळधार पावसामुळे सकाळी वेर्स्टन एक्स्प्रेस वे वर दरड कोसळली. यामुले गोरेगावच्या दिशेनं जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. रस्त्यावर आलेले दगड उचलण्यासाठी हा रोड सध्या बंद करण्यात आला आहे.



हेही वाचा

२४ तासात मुंबईत ४२ ठिकाणी झाडे पडल्याच्या तक्रारी

दक्षिण मुंबईत पावसाचा कहर, रस्त्यावरील गाड्या पाण्याखाली

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा