मुंबईत पडणारा पाऊस हा दरवर्षी पालिकेसह मुंबईकरांची परीक्षा घेत असतो. मुंबईत सोमवारी सायंकाळपासून मुंबईत कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने शहरात ४२ ठिकाणी झाडं आणि फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. तर पावसामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचल्यामुळे शहरातील २५ ठिकाणांवरील वाहतूक ही पर्यायी मार्गांवर वळवण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. शहरात कुलाबा येथे २५२.२ मीमी पाऊस तर सांताक्रूझमध्ये २६८.६ मीमी पावसाची नोंद ही मंगळवारी सकाळी ८ पर्यंत करण्यात आली आहे.
हेही वाचाः-Mumbai Rains : मुसळधार पावसामुळे मुंबईची झाली तुंबई, ‘हे’ रस्ते बंद
मुंबईवर आधीच कोरोनाचे सावट असताना वेळोवेळी पाऊस हा परीक्षा घेत आहे. मुंबईत २४ तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार सोमवारी सायंकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात हिंदमाता, दादर टीटी, सायन रोड नं २४ , गांधी मार्केट, सायन रोड नं १४ रुईया काँलेज, एसआयईएस काँलेज, समाज मंदीर हाँल, प्रतिक्षानगर या ठिकाणी पाणी साचले. तर पश्चिम उपनगरात अंधेरी सब वे, खार लिंक, दहिसर सब वे, रोड,नॅशनल काँलेज वांद्रे, वीरा देसाई रोड या ठिकाणी पाणी साचले होते. तर पूर्व उपनगरात शितल सिनेमा बैलबाजार, टेंबी ब्रीज, चेंबूर, पोस्टल काँलनी चेंबूर या ठिकाणी पाणी तुंबले साचले असून काही ठिकाणी वाहने पाण्याखाली गेल्याचे पहायला मिळते. त्या ठिकाणी पालिकेच्या कर्मचारी युद्ध पातळीवर पाण्याचा निचरा करण्यासाठी कार्यरत आहेत.
हेही वाचाः-अतिवृष्ठीचा इशारा देत ‘या’ सेवांना पालिकेने जाहिर केली आज सुट्टी
तर मुंबईत सोमवारी सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात मागील २४ तासात ४२ झाडे आणि फांद्या उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. तर पावसामुळे मुंबईत शाँर्ट सर्किटच्या २७ घटना घडल्या आहेत. त्यात शहरात १६, पूर्व उपनगरात ६, पश्चिम उपनगरात ५ ठिकाणी घटना घडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. वेळीच सर्व ठिकाणी मदतकार्य पाठवण्यात आली आहेत. तर पावसामुळे सखल भागात साचलेल्या पाण्यामुळे शहरातील २५ ठिकाणांवरील वाहतूक ही पर्यायी मार्गांवर वळवण्यात आली आहे.
वाहतूक वळवण्यात आलेले मार्ग
हिंदमाता, प्रतिक्षानगर, शेर काँलनी-चेंबूर, वांद्रे टाँकीज, शास्त्रीनगर-गोरेगाव, दहिसर सब वे, एस.व्ही.रोड अंधेरी मार्केट, अजित ग्लास- ओशिवरा पूल, खोदादाद सर्कल-दादर, शितल सिनेमा बैलबाजार- कुर्ला, विद्याविहार स्थानक, ओबेराँय माँल, मालाड सब वे, आशिर्वाद हाँटेल, भाऊ दाजी रोड, अंधेरी एमआयडीसी-मरोळ, बामन दया पाडा, मुलुंड एलबीएस मार्ग, गोल देऊळ, भेंडीबाजार, परळ ब्रीज, मालवणी म्हाडा काँलनी, अँण्टाँप हिल, संगम नगर, मराठा काँलनी