Advertisement

अतिवृष्ठीचा इशारा देत ‘या’ सेवांना पालिकेने जाहिर केली आज सुट्टी

मुंबईत येत्या २४ तासात अतिवृष्ठीचा इशारा देण्यात आल्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये आस्थापन बंद ठेवण्याचे आवाहन मुंबई महानगर पालिकेने केले आहे.

अतिवृष्ठीचा इशारा देत ‘या’ सेवांना पालिकेने जाहिर केली आज सुट्टी
SHARES

मुंबईसह पूर्व उपनगर, ठाणे, पालघर परिसरात सोमवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. मंगळवारी पहाटे पावसाचा जोर वाढला. त्यामुळे मुंबईच्या सखल भागात राहणाऱ्या अनेक परिसरांमध्ये पाणी साचले. त्यामुळे झालेल्या वाहतूककोंडीमुळे वाहतूक पर्यायी मार्गांवर फिरवण्यात आली. मुंबईत येत्या २४ तासात अतिवृष्ठीचा इशारा देण्यात आल्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये आस्थापन बंद ठेवण्याचे आवाहन मुंबई महानगर पालिकेने केले आहे.

हेही वाचाः- वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर लँडस्लाईड, गोरेगावच्या दिशेनं जाणारी वाहतूक जाम

सोमवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाने मुंबईची झोप उडवली.  पावसामुळे मुंबईतील अनेक सखल परिसरात गुडघाभर पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी झाली. नागरिकांच्या घराघरांमध्ये पाणी भरल्याने संपूर्ण रात्र जागून काढण्याची वेळ त्यांच्यावर आली. मंगळवारी पहाटेपर्यंत पावसाचा जोर कायम होता. मुंबईतील दादर हिंदमाता, सायन, किंग्ज सर्कल, माटुंगा, अंधेरी सबवे आणि कुर्ला परिसर जलमय झाला आहे. हिंदमातामध्ये तर दोन ते तीन फूट पाणी भरल्याने येथील वाहतूक कोंडी झाली आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर मुंबई महानगरपालिकेने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचाः- Mumbai Rains : मुंबईत मुसळधार पाऊस, रेड अलर्ट जाहीर

मुंबई शहर व उपनगरात आज मुसळधार पर्जन्यवृष्टीची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच मुंबईतील समुद्रात आज दुपारी १२ वाजून ४७ मिंनिटांनी भरती येणार असून ४.४५ मीटरच्या लाटा उसळण्याची शक्यात आहे. यामुळे मुंबईतील नागरिकांनी अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, समुद्रकिनारे तसेच पाणी भरलेल्या ठिकाणापासून लांब राहावे असे आवाहन मुंबई महापालिकेकडून नागरिकांना करण्यात आले आहे. तसेच मुंबई सोमवार रात्रीपासून सुरु असलेल्या संततधार पावसाच्या व भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज महापालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे.

हेही वाचाः- Mumbai Rains : मुसळधार पावसामुळे मुंबईची झाली तुंबई, ‘हे’ रस्ते बंद

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यातील काही ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते. तर उद्या पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच नाशिक, अहमदनगर, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात मंगळवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा