Advertisement

दक्षिण मुंबईत पावसाचा कहर, रस्त्यावरील गाड्या पाण्याखाली

दक्षिण मुंबईतील गोल देऊळ आणि कुंभारवाडा परिसरात गाड्या पाण्याखाली गेल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले. मुंबई शहर व उपनगरात आज मुसळधार पर्जन्यवृष्टीची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

दक्षिण मुंबईत पावसाचा कहर, रस्त्यावरील गाड्या पाण्याखाली
SHARES

मुंबईसह पूर्व उपनगर, ठाणे, पालघर परिसरात सोमवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. मंगळवारी पहाटे पावसाचा जोर वाढला. दक्षिण मुंबईतील गोल देऊळ आणि कुंभारवाडा परिसरात गाड्या पाण्याखाली गेल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले. मुंबई शहर व उपनगरात आज मुसळधार पर्जन्यवृष्टीची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच मुंबईतील समुद्रात आज दुपारी १२ वाजून ४७ मिंनिटांनी भरती येणार असून ४.४५ मीटरच्या लाटा उसळण्याची शक्यात आहे. यामुळे मुंबईतील नागरिकांनी अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, समुद्रकिनारे तसेच पाणी भरलेल्या ठिकाणापासून लांब राहावे असे आवाहन मुंबई महापालिकेकडून नागरिकांना करण्यात आले आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा