Advertisement

लोकल प्रवासासाठी क्यु-आर कोड मिळवण्यासाठी १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

रेल्वे प्रशासनाने अत्याश्यक सेवेतील प्रवास करणाऱ्यांसाठी क्यु-आर कोड प्रणाली लागू केली आहे. क्यु-आर कोड पास असेल तरच अत्याश्यक सेवेत काम करणाऱ्यांना लोकलमधून प्रवास करता येतो.

लोकल प्रवासासाठी क्यु-आर कोड मिळवण्यासाठी १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
SHARES
मुंबईत अत्याश्यक सेवेसाठी विशेष रेल्वे सेवा सुरु आहे. रेल्वे प्रशासनाने अत्याश्यक सेवेतील प्रवास करणाऱ्यांसाठी क्यु-आर कोड प्रणाली लागू केली आहे. क्यु-आर कोड पास असेल तरच अत्याश्यक सेवेत काम करणाऱ्यांना लोकलमधून प्रवास करता येतो.  क्यु-आर कोड मिळवण्याची मुदत आता १० ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. याआधी ३० जुलैपर्यंत मुदत होती. १० दिवसानंतर क्यूआर कोडशिवाय प्रवास करता येणार नाही. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष लोकल सेवा सुरु केल्या आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी क्यु-आर कोड आधारित पास सरकारकडून वितरित करण्यात येणार आहे. मात्र, कर्मचाऱ्यांची माहिती एकत्र करण्यात राज्य सरकारकडून विलंब होत आहे. त्यामुळे सध्या  क्यु-आर कोडशिवाय प्रवासास संधी देण्यात आली आहे. क्यु-आर कोड मिळवण्याची मुदत  १० ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. मात्र, १० ऑगस्टनंतर क्यूआर कोड शिवाय प्रवास करता येणार नाही. 

मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे आणि पश्चिम रेल्वेरील अत्यावश्यक प्रवाशांसाठी हा 'क्यूआर कोड' पास बंधनकारक असणार आहे.  अत्यावश्यक कर्मचाऱ्यांचा प्रवास सुरु करण्याचे ठिकाण, कार्यालयाच्या वेळा आणि अन्य तपशील यांची माहिती एकत्र करण्याचे काम राज्य सरकारने सुरु केलं आहे. मात्र, कमी कर्मचाऱ्यांमुळे हे काम त्वरीत होऊ शकलेले नाही. त्यामुळे मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने हा पास मिळेपर्यंत ओळखपत्रावर रेल्वे स्थानकात प्रवेश करण्याची परवानगी दिली आहे.



हेही वाचा

शॉपिंग मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स या तारखेपासून उघडणार

Electricity Bill: सर्वसामान्यांना वीज बिलात सवलत? सरकार ‘अशा’ पद्धतीने करतंय विचार




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा