Advertisement

नॅशनल पार्कमधील वन्यप्राण्यांची होणार डीएनए चाचणी, महाराष्ट्र ठरणार पहिले राज्य

वन्यप्राण्यांची डीएनए चाचणी करण्यासाठी प्रयोगशाळा उभारणारा महाराष्ट्राचा वन विभाग देशात पहिला ठरला आहे.

नॅशनल पार्कमधील वन्यप्राण्यांची होणार डीएनए चाचणी, महाराष्ट्र ठरणार पहिले राज्य
SHARES

 बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील (नॅशनल पार्क) प्राण्यांची आता डीडीएनए चाचणी होणार आहे. वन्यप्राण्यांची डीएनए चाचणी करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. डीएनए चाचणी करण्यासाठी राज्याच्या वन विभागाने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात स्वत:ची प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. 

वन्यप्राण्यांची डीएनए चाचणी करण्यासाठी प्रयोगशाळा उभारणारा महाराष्ट्राचा वन विभाग देशात पहिला ठरला आहे. प्रयोगशाळा उभारण्यासाठी ३ कोटी ९६ लाख रुपये खर्च येणार आहे. हा निधी उद्यान व्यवस्थापनाला उपलब्ध झाला आहे.  प्रयोगशाळा उभारण्याची प्रक्रिया सुरु झाल्याचं उद्यानाचे मुख्य वन संरक्षक अन्वर अहमद यांनी सांगितलं.

एखाद्या प्राण्याच्या हल्ल्यात जेव्हा मनुष्य मृत्यूच्या घटना घडतात तेव्हा त्या प्राण्याला ओळखून जेरबंद करणं महत्वाचं ठरतं.  आतापर्यंत अशा प्राण्याची ओळख पटविण्यासाठी पायांचे ठसे किंवा शरीरावरील ठिपके किंवा पट्टयांचा वापर केला जात होता. मात्र, प्राण्यांची तंतोतंत ओळख होण्याकरिता डीएनए चाचणी करणे आवश्यक ठरत असल्याची बाब लक्षात घेऊन वन विभाग स्वत:ची प्रयोगशाळा उभारणार आहे. सद्या डी.एन.ए चाचणी करण्यासाठीचे नमुने हैदराबाद व भारतीय वन्यजीव संस्था डेहराडून यांच्याकडे पाठविले जातात. या चाचणीचे परिणाम मिळण्यासाठी अनेक महिने वाट पहावी लागते.हेही वाचा  -

एमएमआरडीएमार्फत पर्यावरण रक्षणासाठी २८० कोटींचा निधी
संबंधित विषय