Advertisement

एमएमआरडीएमार्फत पर्यावरण रक्षणासाठी २८० कोटींचा निधी

एमएमआरडीएनं पर्यावरण रक्षणासाठी २८० कोटी रुपयांचा निधी दिला आहे.

एमएमआरडीएमार्फत पर्यावरण रक्षणासाठी २८० कोटींचा निधी
SHARES

एमएमआरडीएनं पर्यावरण रक्षणासाठी २८० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यापैकी ३२ कोटी निधीचा विनियोग बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी करणार आहे. शिवडी न्हावा शेवा ट्रान्स हार्बर (एमटीएचएल) प्रकल्प राबवताना परिसरातील फ्लेमिंगो सारख्या पक्षांचा अधिवास अबाधित रहावा, तिवरांच्या जंगलांचे, संबंधित वनक्षेत्राचे संरक्षण व्हावे तसेच समुद्री पर्यावरणही राखले जावे, बाधित मच्छिमारांना नुकसान भरपाई यासाठी एमएमआरडीए तब्बल २८० कोटी रुपये खर्च करणार आहे. या प्रकल्पाचं काम सुरू असताना, काम संपल्यानंतर व त्यापुढील काळ, अशा १० वर्षांच्या कालावधीसाठी निधीचा विनियोग कसा करावा, याची आखणी करण्यात आली आहे.

यंत्रणा उभारावी लागणार

या कामासाठी जीपीएस यंत्रणा, उच्च क्षमतेचे कॅमेरे, टेलिस्कोप, पाण्याचे नमुने तपासणारी उपकरणे, तापमानातील बदल टिपणारी उपकरणे, जीएसएम टॅग, पक्षांना लावण्यात येणारे टॅग आदी यंत्रणा उभारावी लागणार आहे. ६ जणांच्या टीमसह ४ पक्षी निरीक्षक पुढील १० वर्षे याच कामांवर लक्ष केंद्रीत केलं जाणार आहेत. या सगळ्याचा दस्तावेज तयार करण्यात येणार आहे.


तिवरांचं विस्तीर्ण जंगल

शिवडी न्हावा शेवा परिसर हा फ्लेमिंगो पक्षांसाठी प्रसिद्ध असून, फ्लेमिंगो पाहण्यासाठी हजारो पर्यटक इथं गर्दी करतात. तसंच, या परिसरात तिवरांचं विस्तीर्ण जंगलही आहे. प्रकल्प राबवताना या सगळ्याचं संवर्धन होणं आवश्यक आहे. प्रकल्पाला कर्ज देणाऱ्या जपानच्या जायका या वित्तीय संस्थेनं कर्ज देताना पर्यावरण संवर्धनाबाबत कठोर अटी घातल्या आहेत. या अटींची पूर्तता करणं बंधनकारक आहे.

पक्षांची माहिती

पक्षांचं कायम वास्तव्य, स्थलांतरित पक्षांचे प्रमाण, कोणत्या भागात जास्त पक्षी येतात याची दररोज माहिती ठेवली जाणार आहे. प्रकल्पामुळे समुद्राचे पर्यावरण बाधित होत असल्यास कोणती उपाययोजना करावी, हेही यात अंतर्भूत आहे.


निधीचं वाटप

  • तिवरांचं संवर्धन २५ कोटी
  • ध्वनी प्रतिबंधक यंत्रणा ४५ कोटी
  • एमटीएचल परिसरात एलईडी १० कोटी
  • लँडस्केपिंग ८ कोटीहेही वाचा-

'या' अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ५ दिवसांचा आठवडा?

एकही आमदार फुटणार नाही- आशिष शेलारRead this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा