Advertisement

'या' अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ५ दिवसांचा आठवडा?

राज्यातील शेतकरी, बेरोजगार आणि सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

'या' अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ५ दिवसांचा आठवडा?
SHARES

राज्यातील शेतकरी, बेरोजगार आणि सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ५ दिवसांचा आठवडा करण्याचा राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारनं निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नेहमीच सरकारी अधिकारी-कर्मचारी यांची बाजू घेतलेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री बनल्यानंतर सरकारी कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी या कर्मचाऱ्यांना आश्वासन दिलं.

मागण्याचं निवेदन

५ दिवसांचा आठवडा, सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ५८ वरून ६० वर्षे करावी, यासारख्या मागण्याचं निवेदन सरकारी अधिकारी-कर्मचारी संघटनांच्या वतीनं मुख्यमंत्री ठाकरे यांना दिलं जाणार आहे. त्यांपैकी ५ दिवसांच्या आठवड्याबाबत निर्णय घेण्यास मुख्यमंत्री राजी झाल्याचं समजतं. या निर्णयासाठी राज्य सरकारच्या तिजोरीवर आर्थिक भार पडणार नसून, त्यामुळं हा निर्णय तातडीनं घेतला जाणार आहे.

सरकारचं प्राधान्य

शेतकरी, बेरोजगार आणि सरकारी अधिकारी-कर्मचारी यांच्या प्रश्नांना या सरकारचं प्राधान्य असेल. महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात त्याबाबत उल्लेख असल्याचंही सांगण्यात आलं आहे.



हेही वाचा -

एकही आमदार फुटणार नाही- आशिष शेलार

१२ आमदार भाजपा सोडणार?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा