Advertisement

मुंबईत ५ ऑगस्टपासून २० टक्के पाणी कपात

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रांमध्ये जुलै महिना संपला तरी अद्याप पावसाची दमदार हजेरी लागलेली नाही. त्यामुळे धरणांतील पाण्याच्या पातळीत मोठी घट होत आहे.

मुंबईत ५ ऑगस्टपासून २० टक्के पाणी कपात
SHARES

मुंबईत ५ ऑगस्टपासून २० टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रांमध्ये जुलै महिना संपला तरी अद्याप पावसाची दमदार हजेरी लागलेली नाही. त्यामुळे धरणांतील पाण्याच्या पातळीत मोठी घट होत आहे. त्यामुळे पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाणी कपात मुंबई, ठाणे, भिंवडी या महापालिका आणि परिसरांतील गावांनाही लागू असणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या ३४. ४९ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.


मुंबईचा पाणीपुरवठा ३१ जुलै २०२१ पर्यंत सुरळीपणे चालू ठेवण्‍यासाठी पाणी पुरवठ्यात ५ ऑगस्टपर्यंत २० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्‍या जल अभियंता खात्‍याद्वारे देण्‍यात आली आहे. वैतरणा, विहार, तुळशी आणि तानसा या सात धरणांतून मुंबईला रोज ३८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. मुंबईची वर्षभराची तहान भागविण्यासाठी या धरणांत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणी साठय़ाची गरज भासते. परंतु यंदा धरण क्षेत्रांत पुरेस पाऊस न झाल्याने धरणांतील पाण्याच्या पातळीत घट होत आहे.


सध्या सातही धरणांमध्ये मिळून ४ लाख ९९ हजार दशलक्ष लिटर पाणी साठा उपलब्ध आहे. हा पाणीसाठा ऑक्टोबरअखेरपर्यंत मुंबईकरांची तहान भागवू शकतो इतका आहे. त्यात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रांमध्ये अद्याप पावसाची दमदार हजेरी लागलेली नाही. त्यामुळे पाणी कपात करण्यात येणार आहे.  


हेही वाचा

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर लँडस्लाईड, गोरेगावच्या दिशेनं जाणारी वाहतूक जाम

Mumbai Rains : मुंबईत मुसळधार पाऊस, रेड अलर्ट जाहीर




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा