
मंगळवार, 10 मार्च रोजी उष्णतेची लाट (हीटवेव्हसारखी परिस्थिती) वाढण्याची शक्यता असल्याने भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
IMD च्या अंदाजानुसार, मुंबईत तापमान 24°C ते 37°C दरम्यान राहू शकते. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांनी थेट उन्हात जास्त वेळ राहू नये, पुरेसे पाणी प्यावे आणि हलका आहार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, गेल्या 24 तासांत मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेत (AQI) थोडी सुधारणा दिसून आली आहे, मात्र काही भागांमध्ये प्रदूषणाची समस्या अजूनही कायम आहे.
सध्या शहराचा एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) 165 असून तो ‘Poor’ (खराब) श्रेणीत आहे. हा आकडा सोमवारी असलेल्या 255 AQI पेक्षा कमी आहे. सोमवारी संध्याकाळी सुमारे 6.30 वाजता AQI 55 पर्यंत खाली आला होता. त्यामुळे काही वेळ हवा ‘Good’ (चांगली) श्रेणीत होती. मात्र रात्री पुन्हा प्रदूषण वाढून AQI 165 पर्यंत गेला.
मुंबईतील काही भागांत प्रदूषण खूप जास्त नोंदवले गेले. वडाळा ट्रक टर्मिनल येथे AQI 343 नोंदवला गेला, जो ‘Severe’ (अत्यंत गंभीर) श्रेणीत येतो. तसेच RBI स्टाफ क्वार्टर्स स्टेशन 3 (317), शिवडी वेस्ट (313), यज्ञनगर (309) आणि कम्मनवार नगर (308) येथेही प्रदूषणाचा स्तर अत्यंत जास्त होता.
तर काही भागांत हवा तुलनेने स्वच्छ होती. ग्रीन हिल्स येथे AQI 32 नोंदवला गेला, जो ‘Good’ (चांगला) आहे. तसेच कामा इंडस्ट्रियल इस्टेट (58), मेघदूत (60), नटवर नगर (65) आणि ठाकूर व्हिलेज (65) येथे हवा ‘मोडरेट’ (मध्यम) श्रेणीत होती.
सामान्यतः AQI 0 ते 50 चांगला, 51 ते 100 मध्यम, 101 ते 200 खराब, 201 ते 300 अतिखराब, आणि 300 पेक्षा जास्त अत्यंत धोकादायक मानला जातो.
हेही वाचा
