लवकरच पश्चिम रेल्वेवर १५ डब्यांच्या २४ लोकल फेऱ्या होणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत अधिक वाढ झाली आहे. लोकल फेऱ्यांच्या तुलनेत प्रवासी जास्त असल्यानं अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळं रेल्वे प्रशासन प्रवासीसुविधा वाढवत आहे. अशातच आता पश्चिम रेल्वेवरील अंधेरी ते विरार धिम्या मार्गावर १५ डब्यांच्या लोकल प्रकल्पाच्या कामाला गती देण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून मार्चपासून या मार्गावर १५ डब्यांच्या २४ फेऱ्याचालवण्याचा विचार होत असल्याची माहिती येत आहे.

पश्चिम रेल्वेच्या अंधेरी ते विरार मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. अंधेरी, बोरिवली, भाईंदर, मीरा रोड, विरार स्थानकांत प्रवासी संख्या गेल्या काही वर्षात वाढली आहे. त्यामुळे सकाळी व सायंकाळी गर्दीतील प्रवास जीवघेणाच ठरतो. हा प्रवास सुकर करण्यासाठी अंधेरी ते विरार दरम्यान धिम्या मार्गावरही १५ डबा लोकल चालविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या कामाला २ वर्षांपूर्वीच सुरुवात करण्यात आली होती. जानेवारी २०२० पर्यंत प्रकल्प पूर्ण केला जाणार होता. परंतु, अंधेरी, जोगेश्वरी, भाईंदर, वसई, विरार येथील काही तांत्रिक कामांत आलेल्या अडथळ्यांमुळे हा प्रकल्प एप्रिल २०२० पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले होते. त्यानुसार कामाला गती दिली जात असताना मार्चमध्ये टाळेबंदी लागली आणि सुरुवातीचे ३ महिने काही प्रमाणात काम रखडले. त्यानंतर कामाला काहीशी गती देण्यात आली.

प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले असून मार्च २०२१ पासून याच मार्गावर १५ डब्यांच्या २४ लोकल फे ऱ्यासुरू करण्याचे नियोजन आहे. सध्या १५ डब्यांच्या ५४ लोकल फेऱ्याचर्चगेट ते विरार, डहाणू स्थानकादरम्यान धावतात. साधारण वर्षभरात १५ डब्यांच्या एकूण लोकल फेऱ्यांची संख्या १४६ पर्यंत नेण्याचे पश्चिम रेल्वेचे उद्दिष्ट आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या