मुंबईतील तलावांची दुरवस्था झाली असून पुसत चाललेली ओळख पुन्हा जिवंत करण्यात येणार आहे. हे तलाव (lakes) पुनरुज्जीवित करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारचे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.
हे तलाव पुनरुज्जीवित करण्यासाठी मुंबई महापालिकेचा (bmc) वातावरणीय बदल व पर्यावरण विभाग सल्लागाराची नियुक्ती करणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मुंबईत सुमारे 140 तलाव आहेत. मात्र कचऱ्याचा भार आणि तलावांमधील वनस्पती व जीवजंतूंच्या अस्वच्छ परिस्थितीमुळे तलावतील पाण्याची गुणवत्ता खालावली आहे.
तलावांचे पुनरुज्जीवन करण्याच्या उद्देशाने, प्रस्तावित योजनेत तलावाच्या परिसरातील गाळ काढणे, स्वच्छता करणे तसेच संपूर्ण सुशोभीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे.
खासदार पियूष गोयल यांनी मुंबईतील दुरवस्था झालेल्या तलावांचे पुनरुज्जीवन करण्याची सूचना केली होती. त्यानुसार मुंबईतील (mumbai) प्रथम 15 तलाव पुनरुज्जीवित केले जाणार आहेत.
हे तलाव राज्य सरकारच्या अखत्यारितील असून त्यांच्या कामासाठी नुकतेच ना हरकत प्रमाणपत्र मुंबई महापालिकेला प्राप्त झाले आहे.
आता सल्लागाराची नियुक्ती केली जाईल, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्याने दिली. मालाड (malad) मालवणी, मनोरी, मढ, एरंगळ, दारवली भागातील 15 तलाव आहेत.
यामध्ये पाथरेवाडी, अली, कमल, दारीवली, भाटी, हिरादेवी, वेनीला, भुजाले तलाव, करजाई देवी तलाव, खरताळे तलाव, सुमलई तलाव, गाव तलाव, पोसरी तलाव, हरबादेवी तलाव, शांताराम तलाव यांचा समावेश आहे.
हेही वाचा