जुहू चौपाटीवर ६ मुलं बुडाली, ४ बेपत्ता, दोघांना वाचवण्यात यश

(Representational Image)
(Representational Image)
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

जुहू चौपाटीजवळील समुद्रात ६ जण बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात २ जणांना स्थानिकांनी वाचवलं आहे. तर, ४ जण अद्यापही बेपत्ता आहेत. बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली.

सोमवारी सायंकाळच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच महापालिका, अग्निशमन पोलीस आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन आणि नौदलाकडून चौघांचा शोध सुरू आहे.

बिपरजॉय चक्रीवादळामुळे समुद्राला उधाण आले आहे. अशा स्थितीत पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यांवर जाऊ नये, अशा सूचना महापालिकेने पर्यटकांना दिलेल्या होत्या. मात्र तरीही मुलं जुहू चौपाटीवर फिरण्यासाठी गेली. लाटांचा अंदाज न आल्याने मुलं समुद्रात बुडाल्याची माहिती कळतीये.


हेही वाचा

नवी मुंबई : आनंदाची बातमी! पाणीपुरवठा पूर्ववत

पुढील बातमी
इतर बातम्या