Advertisement

नवी मुंबई : आनंदाची बातमी! पाणीपुरवठा पूर्ववत

12 जून रोजी 472.87 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात आला आहे

नवी मुंबई : आनंदाची बातमी! पाणीपुरवठा पूर्ववत
SHARES

मान्सूनपूर्व पाणीपुरवठ्यासंबंधी आवश्यक कामे करण्यासाठी एमआयडीसीतर्फे 2 व 3 जून रोजी दुरुस्तीच्या कामासाठी शटडाऊन तर 7 जून रोजी नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरणाची मुख्य जलवाहिनी व भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रावर शटडाऊन करण्यात आले होते.

10 जून रोजी, नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरण प्रकल्पाची 2024 मिमी व्यासाची जलवाहिनी फुटली. सदर दुरुस्तीचे काम तात्काळ हाती घेण्यात आले. युद्धपातळीवर  काम पूर्ण करण्यात आले.

अशातच तांत्रिक बिघाडामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने गेल्या आठवडाभरापासून नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले.

नवी मुंबईतील नागरिकांनी या काळात येणाऱ्या अडचणी समजून घेऊन पालिका प्रशासनाला चांगले सहकार्य केले. महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या सूचनेनुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत आवश्यक ती कामे तातडीने करण्यात आली आहेत.

शहर अभियंता संजय देसाई, अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील यांच्या नियंत्रणाखाली पाणीपुरवठा विभागाने नियोजन करून संपूर्ण पाणीपुरवठा व्यवस्था पूर्ववत केली.

आज 12 जूनपासून नवी मुंबईत पाणीपुरवठा सुरळीत सुरू झाला असून 472.87 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात आला आहे.

पाणीपुरवठा व्यवस्थेत अचानक उद्भवलेल्या समस्यांमुळे पाणीपुरवठा व्यवस्थेवर होणारा परिणाम लक्षात घेऊन नवी मुंबईतील नागरिकांनी केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, अद्याप पाऊस सुरू झाला नसल्यामुळे नागरिकांनी नैसर्गिक परिस्थिती लक्षात घेऊन पाण्याचा वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा