वाढवण बंदरासाठी 208 खारफुटींवर कुऱ्हाड

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

पालघर जिल्ह्यातील नियोजित महत्त्वाकांक्षी वाढवण बंदराला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-48 ची जोडणी देण्यासाठी किनाऱ्यालगतच्या भराव क्षेत्रात प्रवेश मार्ग उभारण्याकरिता 208 खारफुटीची झाडे तोडण्यास मुंबई (mumbai) उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आहे.

खारफुटींच्या योग्य संरक्षणाच्या दृष्टीने उच्च न्यायालयाने (bombay high court) पूर्वी दिलेल्या कायमस्वरूपी आदेशाप्रमाणे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने खारफुटींच्या तोडीसाठी याचिकेद्वारे परवानगी मागितली होती.

वाढवण बंदराला (vadhvan port) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-48 शी जोडता यावे यादृष्टीने आठ पदरी नियंत्रित प्रवेश असलेल्या महामार्गाच्या बांधकामासाठी ‘एनएचएआय’ने आवश्यक पर्यावरण, किनारपट्टी नियमन क्षेत्र तसेच वनविषयक परवानग्या प्राप्त केल्या होत्या.

तसेच भरपाई स्वरूपातील वनीकरणाच्या अटींचीही पूर्तता केली होती. त्याअनुषंगाने अडथळा असलेली 208 खारफुटींची झाडे तोडण्यास अंतिम मंजुरी मागितली होती.

वाढवण बंदर जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण आणि महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड यांच्याकडून संयुक्तपणे विकसित करण्यात येत आहे.

या प्रकल्पात प्रत्येकी एक हजार मीटर लांबीचे नऊ कंटेनर टर्मिनल्स, चार बहुउद्देशीय धक्के, चार द्रव मालवाहतूक धक्के, एक रो-रो धक्का आणि तटरक्षक दलासाठी स्वतंत्र धक्का असेल.


हेही वाचा

चर्चगेट आणि विरार दरम्यान रेल्वे सेवा विस्कळीत

बालविवाह रोखण्यासाठी राज्य सरकारचे पुढचे पाऊल

पुढील बातमी
इतर बातम्या