Coronavirus Updates: ३० लाख लिटर दूधपुरवठा रखडला

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कोरोना व्हायरसचा फटका आता दुधावरही बसला आहे. मुंबई आणि परिसरात जवळपास ३० लाख लिटर (सुमारे २५ टक्के) दूधपुरवठा रखडला आहे. यामुळे मोठ्या कंपन्यांनी प्रामुख्याने फक्त सुपर मार्केटनाच पुरवठा सुरू ठेवला आहे. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊन व संचारबंदीमुळं दूधपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे.

किरकोळ दुकानदारांकडील दूधआवक सध्या बहुतांश ठिकाणी थांबवण्यात आली आहे. दररोज सुमारे ८० लाख लिटर दुधाची मुंबई आणि परिसरात मागणी असते. यामध्ये सरकारी आरे व महानंदासह गोकुळ, वारणा, अमूल, मदर्स डेअरी, प्रभात तसेच परराज्यातून येणाऱ्या गोवर्धन आणि नंदिनी या ब्रॅण्डचा समावेश आहे.

या कंपन्या मिळून जवळपास ४५ लाख लिटर दुधाचा पुरवठा करतात, तर अन्य ३५ लाख लिटर दूध किरकोळ विक्रेत्यांकडून विक्री केले जाते. यापैकी सुमारे २२ ते २६ लाख लिटर दुधाचा पुरवठा सध्या रखडल्याची माहिती समोर येत आहे. दूध अत्यावश्यक श्रेणीत असल्यानं बाहेरून पुरवठा सुरळीत आहे. पण जिथे या दुधावर प्रक्रिया करावी लागते, तेथील कर्मचारी सार्वजनिक वाहतूक बंद असल्यानं केंद्रांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. 

परजिल्ह्यातील दुधाची आवक सुरळीत आहे. पण प्राधान्य फक्त सुपर मार्केट व मॉलना आहे. तेथेच अधिक पुरवठा होत असून, मागणी वाढली असल्यानं सध्या किरकोळ दुकानदारांकडे आम्ही पुरवठा बंद केला आहे.


हेही वाचा -

Coronavirus Updates: रुग्णांवर उपचार न केल्यास परवाना रद्द

घरी क्वारंटाईन असणाऱ्यांना लावली जाणार मतदानाची शाई


पुढील बातमी
इतर बातम्या