Advertisement

घरी क्वारंटाईन असणाऱ्यांना लावली जाणार मतदानाची शाई

निवडणुकीत मतदारांच्या हातावर लावण्यात येणारी शाई लावण्याची परावनगी निवडणूक आयोगानं आरोग्य प्रशासनाला दिली आहे.

घरी क्वारंटाईन असणाऱ्यांना लावली जाणार मतदानाची शाई
SHARES

कोरोना व्हायरसमुळे अनेकजण स्वतःच्या घरात होम क्वारंटाईन आहेत. अशा व्यक्तींच्या हातावर निवडणुकीत मतदारांच्या हातावर लावण्यात येणारी शाई लावण्याची परावनगी निवडणूक आयोगानं आरोग्य प्रशासनाला दिली आहे.

निवडणूक आयोगानं यासाठी अटी देखील ठेवल्या आहेत. विशिष्ट परिस्थिती होम-क्वारंटाईन असणाऱ्यांच्या हातावरच शाईचा स्टॅम्प वापरला जाईल. मतदान केल्यानंतर मतदाराच्या डाव्या इंडेक्स बोटाला शाई लावली जाते. त्यामुळे आयोगानं प्रशासनाला कोणत्याही व्यक्तीच्या डाव्या हाताच्या बोटाला शाई लावू नये, असं सांगितलं आहे.

याशिवाय शरीराच्या कोणत्याही ठिकाणी आणि कोणते चिन्ह लावले जाईल, हे देखील निश्चित करण्यास सांगण्यात आलं आहे. जेणेकरून देशातील कोणत्याही भागात निवडणूक होणार असेल, तर समस्या निर्माण होणार नाही.

तसंच, प्रशासनाला ज्या व्यक्तींना शाई लावली जाईल, त्या व्यक्तींचा रेकॉर्ड ठेवण्यास सांगितलं आहे. इतर कोणत्याही कामासाठी शाईचा वापर करू नये, असे आदेश दिले आहेत. याशिवाय आयोगानं सांगितलं की, नखांवर शाई लावल्यास ती अनेक आठवडे राहते. मात्र इतर ठिकाणी त्वचेवर लावल्यास शाई केवळ ३ दिवस राहते.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा