नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईत ३५ हजार पोलीस तैनात

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गर्दी होऊ नये म्हणून महापालिकांच्या हद्दीत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला कोणतीही अप्रिय घटना टाळण्यासाठी आणि कोरोना नियमांची अंमलबजावणी होत आहे की नाही यावर पोलिसांचं लक्ष असेल. यासाठी मुंबईच्या रस्त्यावर ३५ हजार पोलीस तैनात करण्यात येणार आहेत.

मुंबईत नाइट कर्फ्यू लागू केल्याने हॉटेल, पब रात्री ११ वाजता बंद करावे लागणार आहेत.  नियमांचे पालन न करणाऱ्या मालकांवर तसेच कोणीही आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल. नाइट कर्फ्यूच्या आदेशानुसार, पाच पेक्षा जास्त लोकांच्या एकत्र येणावर बंदी आहे. लोक त्यांच्या कुटुंबासोबत बाहेर पडले आणि चार किंवा त्यापेक्षा कमी जण असतील, तर काही अडचण नाही, असे सहाय्यक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितलं आहे.

मुंबईत बोटीवर तसेच इमारतीच्या गच्चीवरही पार्टी करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. छेडछाडीच्या, त्रास देण्याच्या घटना रोखण्यासाठी विविध ठिकाणी विशेष पथक तैनात असणार आहे.बेदरकारपणे वाहन चालवणे तसंच ड्रींक अँड ड्राइव्हविरोधात वाहतूक पोलीस मोहिम राबवतील.


हेही वाचा -

मुंबई लोकलमध्ये होणार 'कोरोना'बाबत जनजागृती

जाहिरातींमध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य; मनसेची पत्राद्वारे पश्चिम रेल्वेकडे मागणी


पुढील बातमी
इतर बातम्या