Advertisement

जाहिरातींमध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य; मनसेची पत्राद्वारे पश्चिम रेल्वेकडे मागणी


जाहिरातींमध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य; मनसेची पत्राद्वारे पश्चिम रेल्वेकडे मागणी
SHARES

मागील काही दिवसांपूर्वी मनसे व अ‍ॅमेझॉन यांच्यात मराठी भाषेवरून झालेल्या वादानंतर मनसेन आता आपला मोर्चा पश्चिम रेल्वेकडे वळवला आहे. पश्चिम रेल्वेने माहिती पत्रके आणि जाहिरातींमध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेकडून करण्यात आली आहे.

पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेच्यावतीने याप्रकरणी पत्र पाठवण्यात आलं आहे. या पत्रात मनसेनं पश्चिम रेल्वेकडून विविध माहितीपत्रके आणि जाहिराती प्रसिद्ध होत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही माहिती दिली जाते. पण सर्व पत्रके, जाहिरातींमध्ये मराठी भाषेचा वापर केला जात नाही.

राज्याची भाषा वापरणेही बंधनकारक आहे. परंतु पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. माहितीपत्रके, जाहिरातील तसेच सोशल मीडियावर मराठी भाषेचा वापर बंधनकारक करण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेने दिला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा