वसई-विरारमध्ये ५६३ इमारती धोकादायक

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

वसई-विरार महापालिका क्षेत्रात ५६३ इमारती धोकादायक आहेत. यामधील १८० इमारती अतिधोकादायक आहेत. पालिकेने धोकादायक असलेल्या इमारतींना नोटिसा दिल्या आहेत. मात्र त्या इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी अद्यापही इमारती खाली केलेल्या नाहीत. ते या इमारतींमध्ये धोकादायक स्थितीत राहत आहेत.

धोकादायक इमारतींना नोटिसा पाठवण्याशिवाय पालिकेने कोणत्याच उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे कोरोनाच्या ह्या संकट काळात वसई-विरार महापालिका क्षेत्रातील धोकादायक असलेल्या इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वसई-विरार महापालिकेच्या नऊ  प्रभागांमध्ये असलेल्या धोकादायक इमारतींची यादी वसई-विरार महापालिकेने  जाहीर केली आहे. यामध्ये एकूण ५६३ इमारती धोकादायक आणि अतिधोकादायक आहेत. 

दरवर्षी पालिकेकडून सर्वेक्षण करून धोकादायक व अतिधोकादायक असलेल्या इमारतींना नोटिसा दिल्या जातात. त अतिधोकादाय इमारतींमधील नागरिकांना घरे खाली करण्यास सांगितलं जातं. मात्र, येथील रहिवाशांना राहण्यासाठी पर्यायी सुविधा उपलब्ध नाही. पालिकेकडे संक्रमण शिबीर नाही. तसेच त्याची कोणत्याही प्रकारची कायमस्वरूपी राहण्याची सुविधा करण्याची तरतूद नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. तसंच नवीन घर घेणे किंवा तुटपुंज्या पगारात भाडय़ाने राहणेसुद्धा नागरिकांना शक्य होत नसल्याने नागरिकांनी जायचे कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.


हेही वाचा -

पोलिसांच्या गटारीवर ‘संक्रात’

KEM रुग्णालयात COVID 19 रुग्णांचे सर्व रेकॉर्ड्स डिजिटल स्वरुपात


पुढील बातमी
इतर बातम्या