मुंबई: मतदारयादीतील 58 हजार नावे वगळली

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

राज्यातील (maharashtra) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मतदारयाद्यांवर आक्षेप घेत महाविकास आघाडी आणि मनसेने मुंबईत (mumbai) काही दिवसांपूर्वीच ‘सत्याचा मोर्चा’ काढला होता.

दुबार मतदार नोंदणीवरून राजकीय वाद पेटलेला असतानाच यंदा मुंबई महानगरपालिका (brihanmumbai municipal corporation) निवडणुकीसाठीच्या मतदारयादीतून विधानसभा निवडणुकीनंतर काही मतदारांची (voters) नावे वगळली आहेत.

1 जुलै 2025 पर्यंत या सात महिन्यांच्या कालावधीत 58 हजार 632 मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत.

यात मुंबई शहरातील 14 हजार 460 आणि मुंबई उपनगरातील 44 हजार 172 मतदारांचा समावेश आहे.

राज्य निवडणूक मुख्य अधिकारी कार्यालयाने 1 जुलै 2025 पर्यंतच्या मतदारयादीतील सविस्तर माहिती संकेतस्थळावर जाहीर केली आहे. त्यानुसार ही माहिती समोर आली आहे.

या प्राप्त माहितीनुसार, मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी (elections) यंदा एकूण 1 कोटी 23 लाख 78 हजार 418 मतदारांची नोंद करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत हाच आकडा 1 कोटी 2 लाख 29 हजार 708 होता. त्यामुळे यंदा मुंबई महानगरपालिका निवडणुकीत विधानसभेच्या तुलनेत 21 लाख 48 हजार 710 नवे मतदार आहेत.

निवडणुक आयोगाच्या आकडेवारीनुसार मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 2024 रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबई शहरात एकूण 25 लाख 43 हजार 610 मतदार होते.

तर, मुंबई उपनगरात हाच आकडा 76 लाख 86 हजार 98 नोंदविण्यात आला होता. त्यानंतर आता या आकडेवारीत यंदा वाढ झाली आहे.

मुंबई शहरात 1 जुलै 2025 पर्यंत 33 हजार 201 व मुंबई उपनगरांत 1 लाख 39 हजार 802 नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली आहेत. त्यामुळे मुंबईतून यंदा एकूण 1 लाख 73 हजार 3 मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.

फॉर्म 6 भरून अर्ज केलेले शहर आणि उपनगरांत अनुक्रमे 27 हजार 200 आणि 1 लाख 13 हजार 936 असे एकूण 1 लाख 41 हजार 136 नवे मतदार आहेत.

त्याबरोबरच फॉर्म 6 ए भरून विदेशातील भारतीय नागरिकांनीही नोंदणी केली आहे. ज्यात शहरातून आठ आणि मुंबई उपनगरांतून 35 मतदारांनी अर्ज सादर केले आहेत. तसेच ते मंजूर करण्यात आले आहेत.

यासोबतच मुंबई शहरातून पाच हजार 993 मतदारांनी आणि 25 हजार 831 मतदारांनी फॉर्म 8 ए भरून दुरुस्तीसाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे यंदाच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी 1 लाख 73 हजार 3 नवमतदार आहेत.

या प्रक्रियेत 58 हजार 632 मतदारांनी फॉर्म 7 भरून नावे वगळण्यासाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे मुंबईतील एकूण 1 लाख 14 हजार 371 नवीन मतदार असणार आहेत.


हेही वाचा 

CSMT: बेकायदेशीर आंदोलनाची मुंबई रेल्वे पोलिसांकडून दखल

मुंबई: 70 किमीच्या भूमिगत बोगद्याच्या कामाला सुरूवात

पुढील बातमी
इतर बातम्या