दादरमध्ये २२ ठिकाणी ६१ 'नो पार्किंग' झोन

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईतील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आणि वाहतुककोंडी सोडविण्यासाठी महापालिकेनं 'नो पार्किग'चा निर्णय घेतला होता. त्यानुसार, नो पार्किंग झोनमध्ये आढळणाऱ्या गाड्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मात्र, तरीही मुंबईतील अनेक भागांत अद्यापही वाहतुककोंडी सुटलेली नाही. यांपैकी दादर परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतुककोंडी निर्माण होत असल्यामुळं महापालिकेनं येथईल २२ ठिकाणी ६१ 'नो पार्किंग झोन' बनविले आहेत. ३० ऑगस्टपासून महापालिकेनं नो पार्किंग झोनला सुरूवात केली असून, मंगळवारपासून कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. 

एक दिवसाची सूट

मिळालेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या जी नॉर्थ विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी 'ही कारवाई वाहतुककोंडी कमी करण्यासाठी करण्यात येत आहे. मात्र, सध्य गणेशोत्सवाची सुरूवात असल्यामुळं मंडळवारपर्यंत रहिवाशांना सूट देण्यात आली आहे. परंतु, बुधवारपासून कारवाई करण्यात येणार असल्याचं म्हटलं.

३ महिने नो पार्किंग

महापालिकेनं नोव्हेंबरपर्यंत वाहतुक पोलीस एनओसी मागितली आहे. त्यामुळं ३ महिने प्रायोगिक तत्वावर ही ६१ ठिकाणं नो पार्किंग झोन क्षेत्र म्हणून राहणार आहेत. ३ महिन्यांनंतर आणखी काही महिने महापालिका हे क्षेत्र नो पार्किंग झोनमध्ये ठेवण्याची शक्यता आहे. 


हेही वाचा -

गणेशोत्सव २०१९: सार्वजनिक मंडळांत 'तंबाखू मुक्त जीवना'चा संदेश

मुंबईत जोरदार पावसाची हजेरी


पुढील बातमी
इतर बातम्या