Advertisement

मुंबईत जोरदार पावसाची हजेरी

मुंबईसह उपगनरात मुसळधार पाऊस सुरू आहे. मंगळवारी पहाटेपासून पावसाचा जोर वाढला असून, दादर हिंदमाता परिसरासह अनेक सखल भागांत पाणी तुंबण्यास सुरुवात झाली आहे.

मुंबईत जोरदार पावसाची हजेरी
SHARES

मुंबईसह उपगनरात मुसळधार पाऊस सुरू आहे. मंगळवारी पहाटेपासून पावसाचा जोर वाढला असून, दादर हिंदमाता परिसरासह अनेक सखल भागांत पाणी तुंबण्यास सुरुवात झाली आहे. जोरदार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसंच, मुंबईत जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

सखल भागांत पाणी

मुंबई पश्चिम उपनगरात सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळं अनेक सखल भागांत पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. त्याशिवाय, रेल्वे रुळांवरही पाणी साचण्यास सुरूवात झाली असून, लोकल वाहतूक उशिरानं सुरू आहे.

सणाची सुरूवात पावसानं

राज्यभरात सोमवारी गणपती बाप्पाचे आगमन झाले असून, गणेश चतुर्थीच्या सणाची सुरूवात पावसानं केली. मात्र, त्यावेळी बाप्पाला घरी आणताना अनेकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागलं.



हेही वाचा -

ट्रान्स हार्बर मार्गावर धावणार एसी लोकल



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा