ट्रान्स हार्बर मार्गावर धावणार एसी लोकल

ठाणे-पनवेल-वाशी या ट्रान्स हार्बर मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खूश खबर आहे. कारण मध्य रेल्वे प्रशासन ट्रान्स हार्बर मार्गावर लवकरच एसी लोकल सु्रू करण्याच्या प्रयत्नात आहे.

SHARE

ठाणे-पनवेल-वाशी या ट्रान्स हार्बर मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खूश खबर आहे. कारण मध्य रेल्वे प्रशासन ट्रान्स हार्बर मार्गावर लवकरच एसी लोकल सु्रू करण्याच्या प्रयत्नात आहे. तसं झाल्यास या मार्गावर प्रवाशांना वातानुकूलीत (एसी) लोकलमधून प्रवास करता येणार आहे. सध्या ट्रान्स हार्बर मार्गावर दररोज १२ लोकल ट्रेनच्या माध्यमातून १९२ फेऱ्या केल्या जातात.  

एक लोकल कमी

मुंबई रेल विकास काॅर्पोरेशन (MRVC)  सोबत नुकत्याच झालेल्या बैठकीत केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्रान्स हार्बर मार्गावर एसी लोकल सुरू करण्यासंदर्भातील सूचना मध्य रेल्वे प्रशासनाला केल्या. याकरीता १२ पैकी १ सेवा कमी करून तिच्या जागी एसी लोकल सुरू करण्यात येईल. तसंच उरलेल्या ११ लोकलमधील फर्स्ट क्लासच्या डब्यांपैकी एक डबा सेकंड क्लासमध्ये बदलण्यात येईल. डब्यात बदल करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्याची माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

फ्रिक्वेन्सी सुधारणार

याआधी मध्य रेल्वे हार्बर मार्गावर एसी लोकल सुरू करण्याचा विचार करत होती. परंतु आम्हाला सध्या एसी लोकल ट्रेनच्या फ्रिक्वन्सीत सुधारणा करण्यास सांगितलं आहे. सद्यस्थितीत प्रवाशांना एसी लोकल ट्रेनसाठी किमान ५० मिनिटे वाट बघावी लागते, असंही या अधिकाऱ्यांने सांगितलं.

या व्यतिरिक्त रेल्वे स्थानकांवर अद्ययावत माहिती फलक, दिशादर्शक लावण्यात यावेत, फूट ओव्हर ब्रिजची कामे जलदगतीने पूर्ण करावीत असे निर्देशही गोयल यांनी मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (MUTP)च्या अधिकाऱ्यांना दिले.

उंच डबे नकोत

मध्य रेल्वे मार्गावर एसी लोकलची सेवा सुरळीतपणे चालवण्यात कुठलाही अडथळा येऊ नये याकरीता म. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF)ला भेट दिली. या भेटीत त्यांनी म. रेल्वे मार्गावरील जुन्या ब्रिजच्या उंचीची माहिती दिली. ४३२७ मी. उंची असलेली ट्रेन म. रेल्वे मार्गावर चालवणं शक्य नसल्याने ही बाब ध्यानात घेऊनच एसी लोकलचे डबे तयार करण्यात यावेत, अशी विनंती त्यांना करण्यात आली आहे.हेही वाचा-

माहीम चौपाटीवर पोलिसांचं अत्याधुनिक 'मरीन हेडक्वार्टर'

सीएसएमटी स्थानकात बफरवर आदळली लोकलसंबंधित विषय
ताज्या बातम्या