धारावीत मार्च महिन्यात ६२ टक्के रुग्ण वाढले

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असताना आता धारावीतही कोरोनाने पुन्हा शिरकाव केला आहे. फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये तब्बल ६२ टक्क्यांची रुग्णवाढ झाल्याची माहीत समोर येत आहे. मात्र यातील ७० टक्क्यांहून अधिक रुग्णांमध्ये लक्षणे आढळलेली नाहीत. मुंबईत गेल्या वर्षी करोनाने शिरकाव केल्यानंतर वरळीपाठोपाठ धारावी करोनाचा हॉटस्पॉट ठरला होता.

१ एप्रिल, २०२० रोजी धारावीत पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर रुग्णांची संख्या वाढत गेली, मात्र पालिकेने संसर्ग रोखण्यासाठी वापरलेला 'धारावी पॅटर्न' यशस्वी ठरल्याने जुलै-ऑगस्टनंतर धारावीत रुग्णसंख्या घटत गेली. त्यानंतर दोन अंकी असलेली रोजची रुग्णसंख्या एकवर आली. मुंबईत फेब्रुवारीच्या मध्यानंतर आटोक्यात आलेला करोना पुन्हा वाढू लागला आहे. काही दिवसांपासून धारावीतही कोरोनाने डोके वर काढले आहे.

यंदाच्या ८ मार्चला १८ रुग्ण, १६ मार्चला २१ तर १८ मार्चला ३० तर २१ रोजी २८ रुग्ण सापडले आहेत. मार्चपर्यंत एकाच महिन्यात धारावीत २७२ बाधित रुग्ण आढळले आहेत. फेब्रुवारीत धारावीत केवळ १६८ रुग्ण आढळले होते. दरम्यान, रुग्ण वाढत असले तरी धारावीत रुग्णवाढ रोखण्यासाठी दररोज १ हजार जणांचे लसीकरण आणि आवश्यक त्या प्रमाणात चाचण्या करण्यात येत आहे.


हेही वाचा -

शरद पवारांनी उल्लेख केलेले ज्युलिओ रिबेरो कोण आहेत? जाणून घ्या

तुम्हाला कर भरावा लागत नसेल तरी भरा आयटीआर, मिळतील 'हे' फायदे


पुढील बातमी
इतर बातम्या