राणीच्या बागेत लवकरच सिंहाचे आगमन होणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

राणी बागेत सिंहांची डरकाळी कधी कानी पडणार चार वर्षांपासूनची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.

गुजरातच्या (gujarat) जुनागड प्राणीसंग्रहालयातील सिंहांची जोडी मुंबईला मिळावी, यासाठी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह यांना 26 मार्चला पत्र लिहिले.

त्यानंतर हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने स्वतः लवकरच गुजरातला जाणार आहे. गुजरातचे मुख्यमंत्री व वनमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे महापौर रितू तावडे यांनी सांगितले तसेच सक्करबाग प्राणीसंग्रहालयाची पहाणी करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

दक्षिण मुंबईतील भायखळा (byculla) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालय पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र आहे.   

या संग्रहालयात 21 पेंग्विन, वाघ, शेकडो प्रकारचे पक्षी, हत्ती, हरणे, माकडे, तरस, अजगर आदी प्रकारचे 13 जातीचे 84 सस्तन प्राणी, 19 जातींचे 157 पक्षी आहेत.

या शिवाय 256 प्रजातींचे आणि 6611 वृक्ष-वनस्पती आहेत तर करकोचा, छत्रबलाक, बगळे, सारस असे पाणथळ पक्षी आहेत.

मे महिन्यात गुजरातला जाणार असून तेथील मुख्यमंत्री व वनमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

राणी बागेत जिमी ही शेवटची सिंहीण होती. तिचा 2014 मध्ये मृत्यू झाला. त्यानंतर सिंह आणण्यासाठी प्रयत्न झाले नाही. मात्र, गेल्या चार वर्षापासून हे प्रयत्न सुरू झाले आहेत.

सक्करबाग प्राणीसंग्रहालयाने सिंहांची (lion) जोडी देण्यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेतली आहे. मात्र, सक्करबाग प्राणीसंग्रहालयाने राणी बाग प्राणीसंग्रहालयाकडे झेब्रा मिळावा, अशी मागणी केली आहे.

मात्र, झेब्रा देणे शक्य होत नसल्याने राणी बागेत देशी विदेशी पशुपक्षी असून ते देण्याची तयारी राणी बाग प्राणीसंग्रहालयाने दर्शवली आहे, असे महापौर रितू तावडे यांनी सांगितले.


हेही वाचा

नवी मुंबई: लॉजिस्टिक्स पार्कसाठी EOI आमंत्रित

2006 मालेगाव स्फोट प्रकरणात 4 आरोपींना दिलासा

पुढील बातमी
इतर बातम्या