जुलै महिन्यातही सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

पावसानं (mumbai rains) सलग जुलै महिन्यातही सरासरीपेक्षा अधिक हजेरी लावली. जुलै महिन्यातील मुंबईच्या पावसाची सरासरी ८४० मिमी असताना यंदा मात्र १ जुलै ते २१ जुलै या कालावधीत सांताक्रूझ इथं १०३२.२ मिमी पाऊस नोंदवला गेला आहे. याच कालावधीत कुलाबा इथं नोंदवला गेलेला पाऊसही दीर्घकालीन सरासरीच्या जवळपास म्हणजेच ७६१.६ मिमी इतका आहे.

१ जूनपासून २१ जुलैला सकाळी ८.३० वाजेपर्यंत कुलाबा इथं १३६६ मिमी आणि सांताक्रूझ येते १९४३.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. कुलाबा आणि सांताक्रूझ येथे कमाल तापमानात ३ अंशांची घट झाली. दोन्ही ठिकाणी २७.४ आणि २७.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.

मुंबई, ठाणे, पालघर येथे गुरूवारी सकाळी काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील २ दिवस इथं मुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी इथं गुरूवारी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यभरात ठिकठिकाणी सुरू झालेल्या पावसामुळे राज्यातील धरणांमधील पाणीसाठा ४ दिवसांत तीन टक्क्यांनी वाढला आहे. शनिवारी राज्यातील धरणांमध्ये ३० टक्के  उपयुक्त पाणीसाठा होता. तो बुधवारी ३३.३९ टक्क्यांवर पोहोचला.


हेही वाचा - 

मालमत्ता थकबाकीदारांवर आता प्रत्यक्ष कारवाई, नवी मुंबई पालिकेचा निर्णय

अकरावी प्रवेशासाठी २१ ऑगस्टला सीईटी


पुढील बातमी
इतर बातम्या