Advertisement

अकरावी प्रवेशासाठी २१ ऑगस्टला सीईटी

ज्या विद्यार्थ्यांना सीईटीमध्ये उत्तम गुण मिळणार आहेत, त्यांना त्यांच्या सीईटीच्या गुणांकनानुसार अकरावी प्रवेशात प्राधान्य देण्यात येईल.

अकरावी प्रवेशासाठी २१ ऑगस्टला सीईटी
SHARES

दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. 11 वी प्रवेशासाठी ऐच्छिक सीईटी परीक्षा होणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं होतं. त्यानुसार आता सीईटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. 

 11 वी प्रवेशासाठी 21 ऑगस्ट रोजी सीईटी परीक्षा होणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 1 वाजताच्या दरम्यानसीईटी होईल. ही परीक्षा 100 गुणांची असून ऑफलाइन पद्धतीने राज्यभरात एकाच वेळी घेतली जाईल.

यावर्षी पहिल्यांदाच दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाद्वारे लागला आहे. यंदा अकरावी प्रवेशात सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांना सीईटीमध्ये उत्तम गुण मिळणार आहेत, त्यांना त्यांच्या सीईटीच्या गुणांकनानुसार अकरावी प्रवेशात प्राधान्य देण्यात येईल. त्यामुळे दहावीच्या निकाल पार पडला असला तरी विद्यार्थ्यांना आता सीईटी परीक्षेच्या दिव्यातून पार पडावे लागणार आहे. 

सीईटीसाठी राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना शुल्क भरावे लागणार नाही. इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणीसाठी 178 रुपये शुल्क भरावे लागणार आहेत.  अर्ज नोंदणी करताना विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र निवडता येणार आहे. राज्य शिक्षण मंडळामार्फत ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे. सीईटी परीक्षा ऐच्छिक असणार असून 100 गुणांसाठी गणित, विज्ञान, समाजशास्त्र , इंग्रजी या चार विषयांचे प्रत्येकी 25 गुणांचे प्रश्न विचारले जाणार आहे. परीक्षा बहुपर्यायी उत्तरांची असणार असून ओएमआर पद्धतीने घेतली जाणार आहे. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा