अपघातामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी, पर्यायी मार्ग तपासा

फाईल फोटो
फाईल फोटो
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

पश्चिम द्रुतगती महामार्गावर दोन कंटेनरमध्ये झालेल्या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून अपघाताची माहिती दिली.

"समता नगर येथे वेर्स्टन एक्स्प्रेस हायवेवर दोन कंटेनरमध्ये झालेल्या अपघातामुळे वाहतूक संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे विमानतळाच्या बाजूने दहिसरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी त्यांच्या प्रवासाचे नियोजन करावे," असे मुंबई वाहतूक पोलिसांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

पर्यायी मार्ग

अपघातानंतर वाहतूक पोलिसांनी प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग सुचवला आहे.

"वाहनचालक खालील पर्यायी मार्गाने जाऊ शकतात: स्लिप रोड जोगेश्वरी फ्लायओव्हर किंवा दिंडोशी फ्लायओव्हरपासून डावीकडे आणि पुढे एसव्ही रोड, लिंकिंग रोडने बोरिवली आणि दहिसरकडे जावे,"


हेही वाचा

उड्डाणे रद्द झाल्यामुळे मुंबई विमानतळावर प्रवाशांचा गोंधळ

आता जुहू चौपाटी अधिक आकर्षक दिसणार, पालिकेचा 'हा' आहे प्लॅन

पुढील बातमी
इतर बातम्या