Advertisement

आता जुहू चौपाटी अधिक आकर्षक दिसणार, पालिकेचा 'हा' आहे प्लॅन

पर्यटकांच्या आवडत्या जुहू बीचला अधिक आकर्षक बनवण्यासाठी पालिकेने येथील सुशोभीकरणावर भर दिला आहे.

आता जुहू चौपाटी अधिक आकर्षक दिसणार, पालिकेचा 'हा' आहे प्लॅन
SHARES

पर्यटकांच्या आवडत्या जुहू बीचला अधिक आकर्षक बनवण्यासाठी पालिकेने येथील सुशोभीकरणावर भर दिला आहे. योजनेनुसार, जुहू समुद्रकिनाऱ्यावर 100 नवीन विद्युत खांब बसवले जातील, जे एलईडी दिव्यांनी उजळले जातील. फूटपाथवर फ्लोअर मॅटिंग लाइट्स आणि बोटीमध्ये लाईटसह समुद्रकिनाऱ्यावर वॉल आर्ट पाहता येणार आहेत. या योजनेवर पालिका ५ कोटी रुपये खर्च करणार आहे.

पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर जुहू समुद्रकिनारा पर्यटकांचे आकर्षण ठरेल. येथे 10 मीटर उंच 100 खांबांवर एलईडी दिवे असलेले गोबो प्रोजेक्टरही बसवले जाणार आहेत. यासह, हायटाइड आणि इतर आपत्कालीन परिस्थितीत घोषणा करण्याची व्यवस्था देखील असेल.

नागरिकांना सामाजिक संदेश देण्यासाठी चौपाटीवर वॉल आर्ट बनवण्यात येणार असून, त्यावर विविध चित्रे साकारण्यात येणार आहेत. मुंबईत पहिल्यांदाच फूटपाथवर फ्लोअर मॅटिंग दिवे बसवण्यात येणार असून त्यामुळे फूटपाथचे आकर्षण वाढणार आहे. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, येथे छोट्या बोटींमध्येही दिवे लावण्यात येणार आहेत.

मुंबईच्या सुशोभिकरणासाठी पालिका 1750 कोटी रुपये खर्च करत आहे. या योजनेंतर्गत गिरगाव चौपाटी, मरिन ड्राइव्ह, माहीम चौपाटी, दादर चौपाटी आणि इतर चौपाटी विकसित केल्या जात आहेत. सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबईतील चौपाट्या देशी-विदेशी पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरणार आहेत.

मुंबईतील सुशोभीकरणाच्या 500 कामांचे भूमिपूजन

ऑगस्ट 2022 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील सुशोभीकरणाच्या 500 कामांचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 320 कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

आतापर्यंत पालिकेने सुशोभीकरणाचे ५० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण केले आहे. एकूण 1077 कामांपैकी सुमारे 650 कामे पूर्ण झाल्याचा दावा पालिकेने केला आहे. सुशोभीकरणाची बहुतांश कामे पावसापूर्वी पूर्ण करण्याचे आदेश आयुक्त चहल यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

  • 100 विद्युत खांबांवर एलईडी दिवे लावण्यात येणार आहेत
  • लाईटिंगसाठी पाच कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत
  • जुहू बीचवर विजेचे खांब 10 मीटर उंच असतील
  • 1750 कोटी रुपयांत मुंबईच्या सुंदरतेत भर पडेल
  • पालिकेने ५० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण केले आहे
  • 1077 पैकी 650 कामे पूर्ण केल्याचा पालिकेचा दावा



हेही वाचा

नेहरू तारांगण बस स्टॉपवर पुस्तकं वाचा आणि मोबाईल चार्ज करा

मुंबईत पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन दुरुस्तीचे काम जोमात

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा