दोन दिवसांनंतर पुन्हा पेट्रोल, डिझेल महागलं

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मागील दोन दिवस इंधनाच्या किंमती स्थिर होत्या. मात्र सोमवारी पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेल महाग झालं आहे. पेट्रोलच्या दरात १८ ते २७ पैशांनी तर डिझेलच्या किंमतीत २६ ते ३५ पैसे वाढ झाली आहे. 

गेल्या आठवड्यात सलग चार दिवस पेट्रोल, डिझेलच्या किमतीत वाढ झाली होती. आठवड्यात पेट्रोल ८७ पैशांनी आणि डिझेल १ रुपयांनी महाग झाले होते. सोमवारच्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचा भाव ९७.८६ रुपये आणि डिझेलच्या दर ८९.१७ रुपये झाला आहे. महाराष्ट्रात सर्वात महाग पेट्रोल परभणीत मिळत आहे. परभणीत पेट्रोल प्रतिलिटर १००.२४ रुपयांवर पोचले आहे. 

फेब्रुवारी महिन्यानंतर मे मध्ये पुन्हा दरांमध्ये वाढ होण्यास सुरूवात झाली आहे.  या वर्षात आतापर्यंत ३१ वेळा इंधनांच्या किमतीत वाढ झाली आहे आणि ४ वेळा किंमती खाली आल्या आहेत. यावर्षी, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जानेवारीत १० वेळा आणि फेब्रुवारीमध्ये १६ वेळा वाढल्या आहेत. तर मार्चमध्ये ३ वेळा आणि एप्रिलमध्ये १ वेळा किमती कमी झाल्या आहेत. या महिन्यात आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत ५ वेळा वाढ झाली आहे.

दररोज सकाळी ६ वाजता तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले जातात. एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार,  RSP सह शहर कोड टाइप करावा लागेल आणि ९२२४९९२२४९  या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता. तसंच बीपीसीएल ग्राहक RSP सह शहराचा कोड क्रमाक  ९२२३११२२२२ या क्रमांकावर आणि एचपीसीएल ग्राहक  ९२२२२०११२२ या क्रमांकावर संदेश पाठवून किमती जाणून घेऊ शकतात.



हेही वाचा -

  1. मुलांसाठी वरळीत होणार ५०० खाटांचे जम्बो कोरोना केंद्र

आठवड्याभरात 'इतक्या' पोलीसांना कोरोनाची लागण


पुढील बातमी
इतर बातम्या