Advertisement

मुलांसाठी वरळीत होणार ५०० खाटांचे जम्बो कोरोना केंद्र

तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा सर्वाधिक त्रास होऊ शकतो, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे मुंबई पालिका अधिक सावधगिरी बाळगत आहे.

मुलांसाठी वरळीत होणार ५०० खाटांचे जम्बो कोरोना केंद्र
SHARES

मुंबईत मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण कमी होत आहे. मात्र, अद्याप धोका टळलेला नाही. कोरोनाची तिसरी लाटही येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा सर्वाधिक त्रास होऊ शकतो, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे  मुंबई पालिका अधिक सावधगिरी बाळगत आहे. 

पालिकेने मुलांसाठी स्वतंत्र जम्बो कोरोना केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेकडून वरळीत ५०० खाटांचं जम्बो कोरोना केंद्र मुलांसाठी सुरू केलं जाणार आहे. या ठिकाणी ७० टक्के ऑक्सिजन आणि २०० आयसीयू खाटा असतील. वरळीत उभारलं जाणारं कोरोना केंद्र १ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी असेल. लहान मुलांबरोबर आई असणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन क्युबिकल पद्धतीने या जम्बो केंद्राची निर्मिती केली जाणार आहे. हे नवीन केंद्र ३१ मेपूर्वी पूर्ण करण्याचा पालिकेचा मानस आहे. या केंद्रासाठी पालिकेला 'सीआरएस' निधीतून ५० कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आहे.

याशिवाय मुंबईत तीन भागात प्रत्येकी २ हजार खाटांचे जम्बो कोरोना केंद्रे बांधली जाणार आहेत. मालाड, सायनचे सोमय्या वैद्यकीय केंद्र आणि कांजुरमार्गमधील क्रॉम्प्टन कंपनीत नवीन जम्बो रुग्णालये उभी करण्यात येतील. तसंच सध्याच्या जम्बो कोरोना केंद्रात ६ हजार अधिक खाटा पुरविल्या जातील. पुढील कालावधीत एकूण ११ जम्बो कोरोना केंद्रे असून त्यातून २० हजार खाटा उपलब्ध होतील. 

  


हेही वाचा -

आठवड्याभरात 'इतक्या' पोलीसांना कोरोनाची लागण

  1. धक्कादायक! पतीच्या संशयावरुन पत्नीची ट्रेन खाली आत्महत्या

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा