COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,08,992
Recovered:
56,39,271
Deaths:
1,11,104
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,773
700
Maharashtra
1,55,588
10,442

धक्कादायक! पतीच्या संशयावरुन पत्नीची ट्रेन खाली आत्महत्या


धक्कादायक! पतीच्या संशयावरुन पत्नीची ट्रेन खाली आत्महत्या
SHARES

विक्रोळी कन्नमवार नगर येथे राहणार्‍या २७ वर्षीय विवाहितने धावत्या ट्रेनखाली मान ठेवून आत्महत्या केल्याची घटना विक्रोळी रेल्वे स्थानक इथं शनिवारी उघडकीस आली आहे. संजना हर्षद शेरे (२७) असे या विवाहितेचे नाव आहे. विक्रोळी पूर्व कन्नमवार नगर येथे राहणार्‍या हर्षद शेरे याच्या सोबत दोन वर्षांपूर्वीच संजनाचा विवाह झाला होता. दरम्यान, मित्रासोबत काढलेल्या सेल्फीवरून पती संशय घेत असल्याच्या कारणावरून तिने टोकाचे पाऊल उचलले, अशी माहिती समोर येत आहे. या आत्महत्येप्रकरणी कुर्ला रेल्वे पोलिसांनी पती, सासू आणि सासरे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून गुन्हा विक्रोळी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

संजना हिचे पदवीपर्यंत शिक्षण झाले असून ती मुंबईत एका खासगी कंपनीत एचआर म्हणून नोकरी करीत होती. संजनानं तिच्या मित्र-मैत्रिणीसोबत काढलेला सेल्फी तिच्या मोबाईल फोनवर लावलेला होता. हा सेल्फी बघून पती हर्षद हा संजनावर संशय घेऊन तिला मारझोड करू लागला होता. पतीच्या संशयी वृत्तीला आणि सततच्या मारहाणीला कंटाळून ७ मे रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ती कामावर जाते असे सांगून घराबाहेर पडली होती.

विक्रोळी रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म क्रमांक ३ आल्यानंतर तिने कल्याणच्या दिशेनं जाणार्‍या जलद रेल्वे रुळावर डोके ठेवून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी संजनाने मोबाईलमध्ये मेसेज टाईप करून वडील आणि भावाच्या व्हॉट्स अ‍ॅपवर पाठवला होता, त्यात तिने पतीच्या संशयी वृत्तीचा आणि सासू सासर्‍याकडून होणार्‍या त्रासाबाबतचा उल्लेख केला आहे. तसेच ‘माझे चारित्र्य स्वच्छ असून मी पती हर्षद यांच्यावर खूप प्रेम करीत होते, त्यानेच माझ्यावर संशय घेतला मी जगून काय करू, मी माझे जीवन संपवत आहे, असे तिने मेसेजमध्ये म्हटले आहे.

मुलीच्या आत्महत्येची माहिती मिळताच संजनाच्या वडिलांनी कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात धाव घेऊन पती हर्षद आणि सासू सासरे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. कुर्ला पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी गुन्हा विक्रोळी पोलीस ठाण्याकडे वर्ग केला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा