पर्यटकांसाठी आता गिरगाव चौपाटीवरही ‘व्ह्युईंग डेक’

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

दादरच्या चौपाटीवर नुकतीच व्ह्युईंग गॅलरी उभारण्यात आली. आता आणखी एक व्ह्युईंग गॅलरी दक्षिण मुंबईत उभारण्यात आली आहे. मुंबईकरांना आता गिरगाव चौपाटीवरील व्ह्युईंग गॅलरीचा आनंद लुटता येणार आहे.

गिरगाव चौपाटी इथल्या ‘स्पेक्टेटर गॅलरी’चं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आलं.

आदित्य ठाकरे म्हणाले की, "या डेकचं नाव श्री प्रमोद नवलकर व्ह्यूइंग डेक ठेवावं. कारण त्यांनी गिरगाव चौपाटीचा कायापालट केला आहे. त्यांच्यामुळे गिरगाव चौपाटीला स्वच्छ, सुंदर समुद्रकिनारा लाभला आहे"

 यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "मंत्रालयातून राजभवनाकडे जाताना या कोपऱ्यात स्वच्छता दिसून आली नाही, हा परिसर दुर्लक्षित राहिला, मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेतला आणि हे काम पूर्ण झाले. गिरगावातील मुंबईकर असो की बाहेरील व्यक्ती चौपाटीवर पर्यटक येतात, ते या गॅलरीचा नक्कीच आनंद घेऊ शकतात."

तांबे चौकाजवळ हे दालन उभारण्यात आले आहे. सुमारे ४७५ चौ.मी. अशा या 'व्ह्युईंग डेक'चा पर्यटक आनंद घेऊ शकतात. इथून तुम्ही अरबी समुद्र, गिरगाव चौपाटी आणि मरीन ड्राईव्हचे विहंगम दृश्य अनुभवू शकता, जे क्वीन्स नेकलेस म्हणून प्रसिद्ध आहे. हा डेक समुद्र पातळी, दाब इत्यादी सर्व घटकांच्या तांत्रिक दृष्टिकोनानुसार बांधला जातो.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यटन पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे मंत्री आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई, खासदार अरविंद सावंत, आमदार मंगलप्रभात लोढा, बीएमसीचे प्रशासक इक्बाल सिंग चहल, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार आदी उपस्थित होते.


हेही वाचा

गोरेगाव-मुलुंड लिंक रोड: दुहेरी बोगद्याचे काम फेब्रुवारी २०२३ पासून होणार सुरू

व्हॉट्सअ‍ॅपवर मिळणार मेट्रोचं तिकीट, ‘या’ नंबरवर करा मेसेज

पुढील बातमी
इतर बातम्या