Advertisement

गोरेगाव-मुलुंड लिंक रोड: दुहेरी बोगद्याचे काम फेब्रुवारी २०२३ पासून होणार सुरू

हे बोगदे ४.७ किमी लांबीचे आणि सुमारे २५ ते २०० मीटर जमिनीच्या खाली असणे अपेक्षित आहे.

गोरेगाव-मुलुंड लिंक रोड: दुहेरी बोगद्याचे काम फेब्रुवारी २०२३ पासून होणार सुरू
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (BMC) गुरुवारी, १४ एप्रिल रोजी सांगितलं की, पालिकेचा महत्त्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (GMLR) प्रकल्पासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (SGNP) खाली बोगद्याचं काम फेब्रुवारीपासूनच सुरू होईल.

पुढील वर्षी म्हणजे २०२३ पासून हे काम सुरू होईल. याआधी, २०२२ च्या मध्यापर्यंत दुहेरी बोगद्याचं काम सुरू होणार असल्याची माहिती मिळाली होती.

GMLR चा एक भाग म्हणून बांधण्यात येत असलेल्या दोन उड्डाणपुलांचे काम गेल्या महिन्यात सुरू झाले. तरी हा रस्ता डिसेंबर २०२६ मध्ये वाहतुकीसाठी खुला होईल. बोगद्याचे काम २०२५ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

हे बोगदे ४.७ किमी लांबीचे आणि सुमारे २५ ते २०० मीटर जमिनीच्या खाली असणे अपेक्षित आहे.

गुरुवारी मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते गोरेगावमध्ये याच प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले.

GMLR संपूर्णपणे मुंबईच्या प्रवासाचा मार्ग बदलणार आहे आणि पालिका हे काम वेळेवर पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध आहे, BMC अधिकारी म्हणाले. या प्रकल्पासह, मुंबईच्या पूर्व-पश्चिम कनेक्टरवरील वाहतूक सुलभ करण्यासाठी पालिका १२.२ किलोमीटर GMLR ची योजना आखत आहे.

अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, सध्या GMLR च्या सध्याच्या रस्त्यावरून गोरेगाव आणि मुलुंड दरम्यान प्रवास करताना, जास्त रहदारीच्या काळात सुमारे ८० मिनिटे लागतात. यामुळे प्रवासाचा वेळ २० मिनिटांपर्यंत कमी होईल.

एका नवीन अहवालानुसार, गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (GMLR) च्या खर्चाचा अंदाज १,५०० कोटींनी वाढला आहे. या प्रकल्पाचे काम अद्याप सुरू झालेले नसल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

GMLR प्रकल्प बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) द्वारे केला जात आहे. मागील वर्षी एप्रिलमध्ये याचा खर्च ४,७७० कोटींच्या घरात जाईल असा अंदाज व्यक्त केला होता. जेव्हा पालिकेनं दुहेरी बोगद्याच्या डिझाइन आणि बांधकामासाठी निविदा पाठवल्या होत्या. परंतु आता हा खर्च वाढून ६,२२५ कोटी झाला आहे.



हेही वाचा

परळमधल्या 'या' पूलाची पुनर्बांधणी करण्याची पालिकेची योजना

घराचं स्वप्न पूर्ण होणार, म्हाडा बांधणार १५ हजार ७८१ घरं

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा