Advertisement

परळमधल्या 'या' पूलाची पुनर्बांधणी करण्याची पालिकेची योजना

हा पूल १९८० च्या सुमारास बांधण्यात आला आहे.

परळमधल्या 'या' पूलाची पुनर्बांधणी करण्याची पालिकेची योजना
(Representational Image)
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिके (BMC) नं परळ टीटी फ्लायओव्हरची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. परळ टीटी जंक्शन इथल्या बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरील प्रवाशांची यामुळे मोठी गैरसोय होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. कारण या उड्डाणपुलामुळे जंक्शनवरील रस्त्याची वर्दळ कमी होण्यास मदत होत आहे.

मात्र, हा प्रकल्प आवश्यक असल्याचं पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. या प्रकल्पाची किंमत सुमारे १६ कोटी रुपये आहे.

उड्डाणपुलावर गर्दीच्या वेळेस प्रचंड वाहतूक कोंडी दिसते, काहीवेळा प्रवाशांना फक्त १०० मीटरचा प्रवास करण्यासाठी १० मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागतो.

हा पूल १९८० च्या सुमारास बांधण्यात आला आणि गेल्या काही वर्षांत त्याच्या डागडुगीची गरज भासू लागली आहे.

अधिका-यांनी सांगितलं की पुलावरील जोडांची संख्या कमी करण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे पृष्ठभाग सपाट राहील. हा प्रकल्प पावसाळ्यापूर्वी हाती घेतला जाणार नाही आणि तो पूर्ण होण्यासाठी सहा महिने लागतील, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.

पावसाळ्यात हे विशेषतः कठीण असते, जेव्हा पाण्यामुळे सांध्याभोवतालच्या कॅरेजवेची धूप होते. खांब पाडले जात नसल्यामुळे जंक्शनवर मोकळी वाहतूक होणार आहे. दुसरीकडे, लोअर परळ इथला डेलिझल पूलही कार्यरत नसल्यानं वाहनधारकांची गैरसोय होत आहे.



हेही वाचा

मुंबईकरांना दिलासा! १ मेपासून आता प्रत्येक घरात पाणी

दादर परिसरात वाहतुकित बदल, 'या' मार्गी वळवली वाहतूक

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा