दहशतवादी हल्ल्याच्या इशाऱ्यानंतर घाटकोपरमध्ये पाेलिसांचा रुटमार्च

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

एकीकडे भारतीय गुप्तचर खात्याने मुंबई, दिल्लीत दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा सुरक्षा दलांना दिलेला असतानाच जुहूतून 26 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झाल्याने देशभरात खळबळ उडालेली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील पोलीस यंत्रणाही सतर्क झाली असून मुंबईतील दंगलविरोधी पथकाच्या पोलिसांनी रविवारी घाटकोपरमध्ये रुटमार्च केला.

केवळ घाटकोपरमध्येच नव्हे, तर मुंबईतल्या सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा रूटमार्च सुरू असल्याची माहिती मिळत आहे. मुंबई गुप्तचर विभाग गेल्या 2 दिवसांपासून बेपत्ता झालेल्या पाकिस्तानी नागरिकांचा शोध घेत असल्याने या रूटमार्चला विशेष महत्व आहे. हा रूटमार्च अतिशीघ्र दलाचे जवान आणि स्थानिक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येत आहे.

गायब असलेले हे 26 जण पाकिस्तानच्या व्हिसावर भारतात दाखल झाले होते. पण त्यातल्या एकानेही भारतात वास्तव्यासाठी अनिवार्य असलेल्या ‘सी फॉर्म’सह इतर औपचारिकता पूर्ण केलेल्या नाहीत. पाकिस्तानी नागरिकाने ‘सी फॉर्म’ भरूनच न देणे आणि भारतीय गुप्तचर यंत्रणेला याची माहिती नसणे निर्विवादपणे भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याची घंटा मानली जात आहे.

[हे पण वाचा - 26 पाकिस्तानी नागरिक मुंबईतून गायब]

पुढील बातमी
इतर बातम्या