कॉर्डेलिया क्रूझवरील सर्व प्रवाशांची RT-PCR चाचणी होईल, त्यानंतरच...

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

सोमवारी संध्याकाळी, ३ जानेवारी रोजी, मुंबई-गोवा कॉर्डेलिया क्रूझवरील ६६ प्रवाशांची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली. २००० प्रवाशांचे यासाठी नमुने घेण्यात आले होते. त्यातील हे ६६ जणं पॉझिटिव्ह आली. मंगळवार संध्याकाळी मुंबईत या क्रूझचं आगमन होणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिके (BMC) चे एक पथक मंगळवार, ४ जानेवारी, संध्याकाळी आगमनानंतर प्रवाशांची तपासणी करेल. क्रूझमधील सकारात्मक प्रवाशांना नियुक्त सुविधांमध्ये विलगीकरणात ठेवण्यात येईल.

शिवाय, इतरांची आरटी-पीसीआर चाचणी होईल आणि त्यांचे कोविड-19 चाचणी निकाल आल्यानंतरच त्यांना क्रूझमधून उतरण्याची परवानगी दिली जाईल.

मंगळवारी, पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी प्राजक्ता आंब्रेकर यांनी एएनआय या वृत्तसंस्थेनं गोव्यात ६६ पैकी सहा जण कसे खाली उतरले याबद्दल माहिती दिली. उर्वरित ६० जण आज मुंबईत परतले आहेत. आंब्रेकर यांनी पुढे सांगितलं की, जहाजावरील प्रवाशांची आरटी-पीसीआर चाचणी केली जाईल ज्याचा निकाल बुधवार, ५ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत येईल.

अहवालानुसार, पालिकेनं स्पष्ट केलं की, ज्या प्रवाशांची चाचणी पॉझिटिव्ह आहे त्यांना जहाजावर विलगीकरणात ठेवलं जाईल. शिवाय, त्यांचे नमुनेही जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जातील.

दुसरीकडे, ज्या प्रवाशांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे त्यांना एक आठवड्याचे होम क्वारंटाईन करावे लागेल. त्याचप्रमाणे, ६० पॉझिटिव्ह प्रवाशांना संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये ठेवलं जाईल, असे प्रशासकीय संस्थेनं नमूद केलं आहे.


हेही वाचा

लोकल सेवेवर निर्बध घालण्याबाबत अद्याप निर्णय नाही

"...तर मुंबईत लॉकडाऊन लागू होईल", महापौरांचं मोठं विधान

पुढील बातमी
इतर बातम्या