Advertisement

लोकल सेवेवर निर्बध घालण्याबाबत अद्याप निर्णय नाही

मुंबईत कोरोना बाधितांचा आकडा हा सर्वात जास्त आहे.

लोकल सेवेवर निर्बध घालण्याबाबत अद्याप निर्णय नाही
SHARES

मुंबईत कोरोना बाधितांचा आकडा हा सर्वात जास्त आहे. त्यामुळं सर्वत्र भीतीदायक वातावरण निर्माण झालं आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येचा विस्फोट झाला तर पुन्हा एकदा आरोग्य सेवेवर मोठा ताण पडणार आहे. असं असलं तरी मुंबई महानगरात धावणाऱ्या, मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल सेवेबाबत मात्र अजुनही कोणतेही निर्बंध घालण्यात आलेले नाहीत.

मुंबईत कोरोना बाधित रुग्ण जरी वाढत असले तरी लोकलबाबतचा निर्णय हा विविध महानगरपालिकांशी संबंधित आहे, तेव्हा याबाबत राज्य सरकारलाच निर्णय घ्यावा लागणार आहे. सध्या मुंबईत पश्चिम रेल्वे मार्गावर लोकल मधून दररोज सुमारे ३० लाखापर्यंत तर मध्य रेल्वे मार्गावर ३६ लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत आहेत.

याआधी फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच लोकल प्रवासाला परवानगी देण्यात आली होती, लसीकरण मोठ्या प्रमाणात झाल्यावर ही बंधने काढून टाकण्यात आली आहेत. यामुळे पूर्वीच्या सरासरी पेक्षा प्रवासी संख्या जरी कमी असली तरी मुंबईत लोकल प्रवास हा आता नेहमीसारखा गर्दीचा झालेला आहे. तेव्हा अशी ही लोकल सेवा हे एक करोनाच्या प्रचाराचे मुख्य साधन ठरू शकते.

त्यामुळं मुंबई शहरातील कोरोना बांधितांची संख्या लक्षात वाढत असतांना पुन्हा टाळेबंदी लागू करण्याची वेळ येऊ नये, खास करुन लोकल प्रवासाबाबत पुन्हा निर्बंध घालण्याची वेळ येऊ नये यासाठी करोना संबंधित नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे. तेव्हा पुढील काही दिवसांत मुंबई शहरातील, मुंबई महानगर भागातील करोना बांधितांच्या संख्येवर लोकल प्रवासाचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा