
या कामामुळे दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी कनेक्टिंग लिंक वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
दुरुस्तीच्या कालावधीत पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना जुन्या मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेच्या घाट मार्गावरून मुंबईकडे वळवण्यात येणार आहे.
त्यामुळे या कालावधीत पुण्याहून मुंबईकडे प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून प्रवासाचं नियोजन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
दरम्यान, मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या दिशेचा कनेक्टिंग लिंक मार्ग वाहतुकीसाठी सुरू राहणार आहे. त्यामुळे मुंबई-पुणे दिशेतील वाहतुकीवर या कामाचा परिणाम होणार नाही.
दुरुस्ती आणि रोड मार्किंगचं काम सुरू असताना वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचं पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
वाहतूक वळवताना काही अडचण आल्यास वाहनचालक मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे कंट्रोल रूम – 9822481224 या क्रमांकावर संपर्क करू शकतात.
तसंच हायवे पोलिस विभाग – 8433481234 या क्रमांकावरही मदत घेता येईल.
ही वाहतूक व्यवस्था केवळ 12 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 3 या तीन तासांच्या दुरुस्ती कालावधीसाठी लागू राहणार आहे.
हेही वाचा
