दादर येथे बेस्ट बसचा मोठा अपघात

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

दादर (dadar) येथे आज सकाळी प्लाझा थिएटर समोर बेस्ट (best) बसचा मोठा अपघात झाला आहे.

हा भीषण अपघात बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने झाल्याची प्राथमिक माहिती आहे. चालकाचा ताबा सुटल्याने बस थेट रस्त्यालगत असलेल्या फुटपाथवर धडकली. ही धडक इतकी भीषण होती की बसच्या (best bus) पुढच्या भागाचे मोठे नुकसान झाले आहे.

सायन रुग्णालयाचे सहायक वैद्यकीय अधिकारी (एएमओ) डॉ. रणधीर यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण चार जखमींना रुग्णालयात आणण्यात आले होते.

अंदाजे 22 ते 25 वर्षे वयोगटातील एका अज्ञात पुरुषाला मृत घोषित करण्यात आले. ऋषभ गुप्ता (अंदाजे 25-30 वर्षे) नावाच्या दुसऱ्या जखमी व्यक्तीच्या डोक्याला दुखापत झाली आहे.

बेस्ट इन्स्पेक्टर सतीश वाघंबरे (48) यांच्या छातीला आणि कमरेला दुखापत झाली आहे, तर महेश डोईफोडे (50) यांच्या डाव्या खांद्याला जबर मार लागला आहे.

जखमींपैकी रिषभ गुप्ता यांच्या डोक्याला जबर मार लागला असल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बेस्ट बसने रस्त्याच्या कडेला असलेल्या बांधकाम स्थळावरील बॅरिकेड्सना धडक दिली आणि एका उत्खनन करणाऱ्या ट्रकला धडक दिली. हा ट्रक बसच्या पुढच्या काचेतून आरपार घुसला.

या अपघातात बेस्ट बसने एका दुचाकीला आणि एका टॅक्सीला धडक दिली आहे. या अपघातात दुचाकी थेट बसखाली चिरडली असल्याने दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.

अपघातात ॲक्टिव्हा इलेक्ट्रिक बाईकचा चालक आणि बस कंडक्टर जखमी झाले आहे. त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच बस चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

तसेच कोतवाल गार्डनजवळ वाहतूक सध्या मंदावली असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे.

हेही वाचा

शिवाजी पार्कमधील धुळीच्या प्रदूषणावर पालिकेचा उपाय

पायाभूत प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुढील बातमी
इतर बातम्या