मुंबई उपनगरात रात्री उशिरापर्यंत बससेवा सुरू

  • भारती बारस्कर & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

दादर - दादर पूर्वेपासून मुंबई उपनगराच्या विविध भांगांमध्ये रात्री उशिरापर्यंत बससेवा सुरू करण्याचा निर्णय बेस्टनं घेतलाय. 1 डिसेंबरपासून ही बससेवा सुरू करण्यात आलीय. या मोहिमेचा शुभारंभ बेस्टचे अध्यक्ष मोहन मिठबावकर यांच्याहस्ते दादरमध्ये पार पडला.

बस मार्ग क्र. २०२ (मर्यादित) चे उद्घाटन १ डिसेंबर २०१६ रोजी रात्री १. ४५ वाजता करण्यात आलं. सदर बसमार्ग दादर रेल्वे स्थानक पूर्व ते गोराई आगार असा कार्यान्वित होईल. याशिवाय बस मार्ग क्र. ४ (मर्यादित)- दादर रेल्वे स्थानक पूर्व ते ओशिवरा आगार- रात्री २. २५ वाजता, बस मार्ग क्र. ३०२ (मर्यादित)- दादर रेल्वे स्थानक पूर्व ते मुलुंड स्थानक पश्चिम- रात्री २. ३० वाजता, बस मार्ग क्र. ५२१ (मर्यादित)- दादर रेल्वे स्थानक पूर्व ते कोपरखैराणे- पहाटे ४. ०० वाजता याप्रमाणे हे अन्य बसमार्ग प्रवर्तित करण्यात येतील.

पुढील बातमी
इतर बातम्या